Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

अ‍ॅपलचे डिव्हाईस वापरण्यासाठी यूजर्सना Apple ID ची गरज असते. मात्र सध्या जगभरातील कित्येक यूजर्स आपल्या अ‍ॅपल आयडीला लॉग-इन करु शकत नाहीयेत.
Apple ID Bug
Apple ID BugeSakal

Apple ID Password Reset : अ‍ॅपल कंपनीचे प्रॉडक्ट्स हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक वापरणारे यूजर्स त्या प्रॉडक्टचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत असतात. मात्र, सध्या अ‍ॅपल यूजर्सना एका अडचणीला सामोरं जावं लागत आहे.

अ‍ॅपलचे डिव्हाईस वापरण्यासाठी यूजर्सना Apple ID ची गरज असते. मात्र सध्या जगभरातील कित्येक यूजर्स आपल्या अ‍ॅपल आयडीला लॉग-इन करु शकत नाहीयेत. एका बगमुळे असं होत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

अ‍ॅपल आयडी पासवर्ड रिसेट बग

9to5Mac या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Apple ID Password Reset असं या बगला म्हटलं जात आहे. यामुळे यूजर्स आपोआपच आपल्या अ‍ॅपल अकाउंटमधून लॉग-आऊट होत आहेत. तसंच, त्यांचं अकाउंट देखील आपोआप लॉक होत आहे. यामुळे यूजर्सना आपला पासवर्ड रिसेट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये.

पासवर्ड रिसेट केल्यानंतर यूजर्स आपल्या अकाउंटला परत लॉग-इन करु शकत आहेत. अ‍ॅपलने आतापर्यंत याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, कित्येक यूजर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला देखील ही समस्या जाणवली असल्याचं सांगत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com