iPhone 5G मिळणार अर्ध्या किंमतीत; वाचा काय आहे खास ऑफर

ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत iPhone खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
iphone
iphonesakal
Updated on

एक वेळ अशी होती की कमी बजेटमुळे ग्राहकांना सेकंड हँड ऍपल आयफोन विकत घ्यावा लागत होता. पण आता iPhone कमी किंमतीत उपलब्ध होत आहे. Apple ने ग्राहकांना स्वस्त iPhone SE मॉडेल कमी किमतीत iPhone खरेदी करण्याची संधी दिली आणि आता Flipkart Sale मध्ये अत्यंत कमी किमतीत महागडा iPhone खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

हेही वाचा : गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

Flipkart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोबाईल फोन्स बोनान्झा सेल सुरू आहे. जो 14 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या काळात अनेक मोबाईलवर सूट मिळत आहे. परंतु Apple iPhone 12 Mini वर सर्वात मोठ्या सवलतीचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. आयफोनचे हे मॉडेल निम्म्याहून कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. यावर 17,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट दिली जात आहे.

Apple iPhone 12 Mini ची अधिकृत किंमत भारतात 59,900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये ती 38,999 रुपयांना आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही जरी कॅशबॅक ऑफरचा लाभ घेत नसला तरीही तुम्हाला जुना फोन बदलून घेण्यावर एक्स्चेंज डिस्काउंटचा फायदा नक्कीच मिळेल.

iphone
फुल चार्जमध्ये 600 किमी धावणारी इलेक्ट्रिक SUV कार लॉन्च; वाचा काय आहेत फीचर्स

या आयफोन मॉडेलवर शॉपिंग साइट 17,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. ही सवलत तुम्ही बदलत असलेल्या जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असते. जर याचा पूर्ण फायदा झाला तर हा iPhone 21,499 रुपयांना खरेदी करता येईल.

Apple iPhone 12 Mini चे फीचर्स

आयफोन 12 सीरीजच्या या कॉम्पॅक्ट आकाराच्या मॉडेलला 5.4-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि सिरेमिक शील्डचे संरक्षण देण्यात आले आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी, या उपकरणातील A14 बायोनिक चिप न्यूरल इंजिन प्रोसेसरसह उपलब्ध आहे आणि 5G कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. मागील पॅनलवर 12MP + 12MP ड्युअल कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त, यात 12MP फ्रंट कॅमेरा देखील आहे, जो 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com