आता iPhone 14 देखील असेल 'मेड इन इंडिया', भारतात सुरू झालं उत्पादन

Apple iPhone 14
Apple iPhone 14google

लवकरच iPhone चाहत्यांना 'मेड इन इंडीया' iPhone 14 विकत घेणार आहे, कारण Apple ने भारतात आपल्या नवीन iPhone 14 चे उत्पादन सुरु केले आहे. Apple ने भारतात पहिल्यांदा iPhone SE चे उत्पादन 2017 मध्ये सुरू केले आणि त्यानंतर iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 चे उत्पादन सुरू झाले. या महिन्याच्या सुरुवातीला Apple ने iPhone 14 सीरीज अंतर्गत चार नवीन iPhone लाँच केले आहेत. आयफोन 14 मध्ये कंपनीने सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि क्रॅश डिटेक्शन ही नवीन फीचर्स दिली आहेत.

दरम्यान मेड इन इंडिया iPhone 14 लवकरच बाजारात दाखल होईल. मेड इन इंडिया iPhone 14 भारतात विकला जाईल आणि निर्यातही केला जाईल. Apple चे भागीदार कंपनी Foxconn भारतात त्यांच्या चेन्नई प्लांटमध्ये iPhone 14 चे उत्पादन करेल. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर आहे.

Apple iPhone 14
मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली 'ही' नवीन SUV, वाचा डिटेल्स

या महिन्याच्या सुरूवातीला Apple ने चार नवीन स्मार्टफोन्स iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max यांचा समावेश आहे. भारतात iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये पासून सुरू होते.. 128GB स्टोरेज मॉडेल या किंमतीत उपलब्ध असेल. iPhone 14, iPhone 14 Plus मध्ये A15 चिपसेट देण्यात आला आहे, जो iPhone 13 मध्ये देखील आहे, तर iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max नवीन चिपसेट A16 Bionic सह लॉन्च करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी, जेपी मॉर्गनच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की भारतात आयफोनचे उत्पादन पुढील तीन वर्षांत म्हणजे 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. Apple ने 2017 मध्ये विस्ट्रॉनच्या मदतीने भारतात आयफोनची निर्मिती केली होती आणि नंतर फॉक्सकॉन देखील भारतात आयफोन तयार करत आहे.

Apple iPhone 14
Mahindra Alturas G4 : महिंद्राच्या SUV चा नवीन स्वस्त व्हेरिएंट लॉंच, वाचा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com