Apple iPhone : Apple iPhone 14 वर 34,901 ची बंपर सूट!, कशी मिळवायची ऑफर जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple iPhone

Apple iPhone : Apple iPhone 14 वर 34,901 ची बंपर सूट!, कशी मिळवायची ऑफर जाणून घ्या

Apple iPhone : Apple iPhone 14 खरेदी करायचा आहे पण बजेट जास्त नाहिये? मग अशावेळी काय करायचं हे आज जाणून घ्या. तुम्हाला Apple iPhone 14 खरेदी करण्यासाठी जास्त नियोजनाची गरज नाहीये. तुम्हाला हा फोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. कारण Flipkart Big Bachat Dhamaal Sale दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे . आणि सेलमध्ये खुप मोठे डिस्काउंट मिळणार आहेत. या सेल मध्ये 79,900 रुपयांची रेंज असलेलेApple iPhone 14 चे Apple iPhone 14 Plus, Apple iPhone 14 Pro आणि Apple iPhone 14 Pro Max

फक्त 44,999 मध्ये खरेदी करता येणार आहेत.

पण Apple iPhone 14 हा Apple iPhone 14 फ्लॅगशिप सिरीजचा एक भाग असला तरी हा फोन Apple iPhone 13 सारखाच आहे. या दोन्ही फोन मध्ये जवळपास सारखेच फीचर आहेत. पण दोन्हीच्या किमतीत मात्र जमीन आस्मानचा फरक आहे. दोन्ही आयफोनची बॉडी, कॅमेरा, ओएस आणि इतर फीचर्स सारखेच आहेत पण दोन्हीच्या किमतीत 10,000 रुपयांपेक्षा जास्त फरक आहे. Apple iPhone 14 कमी किमतीत खरेदी करण्यासाठी डिटेल्स पाहावे लागतील.

7,901 ची सूट मिळून देखील हा फोन फ्लिपकार्टवर 71,999 रुपयांना विकला जातोय. पण जर तुम्ही एचडीएफसी बँकचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय भरल्यास त्यांना इन्स्टंट 4,000 रुपयांची सूट मिळेल. त्यामूळे या स्मार्टफोनची किंमत 67,999 रुपयांपर्यंत खाली येईल. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 23,000 रुपयांपर्यंत सूट देईल. यातून फोनची किंमत आणखीन 44,999 पर्यंत खाली येईल. म्हणजेच सर्व बँक ऑफर मिळून, Apple iPhone 14 ला फ्लिपकार्टवर 34,901 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. थोडक्यात हा फोन तुम्हाला मिळेल 44,999 रुपयांना.

Apple iPhone 14 Specification

Apple iPhone 14 मध्ये Apple iPhone 13 प्रमाणेच चिपसेट आहे. यात iPhone 13 सारखा फ्रंट नॉच आणि 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आहे.