Apple IPhone Discount : Apple iPhone 14 वर 10 हजारांची सूट, स्टॉक संपवण्यासाठी कंपनीची खास ऑफर ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple IPhone Discount

Apple IPhone Discount : Apple iPhone 14 वर 10 हजारांची सूट, स्टॉक संपवण्यासाठी कंपनीची खास ऑफर ?

Apple IPhone Discount : ऍपलने गेल्या वर्षी लॉन्च केलेली नवीनतम iPhone 14 सीरीज ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, जर तुम्ही देखील या सीरीज अंतर्गत लॉन्च केलेला iPhone 14 मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, आजच या Apple iPhone वर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. पण या खास ऑफरचा लाभ कसा मिळणार, याविषयी सविस्तर माहिती देऊ.

हेही वाचा: Auto Tips : नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये येत आहे कारसारखे फीचर, स्पर्श करताच वाजणार अलार्म!

iPhone 14 128GB ची भारतात किंमत

गेल्या वर्षी या आयफोन मॉडेलचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट ग्राहकांसाठी 79 हजार 900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, परंतु आता हे मॉडेल फ्लिपकार्टवर 72 हजार 999 रुपयांना विकले जात आहे, म्हणजेच लॉन्च किंमतीपासून हा फोन तुम्हाला 6 हजार 901 रुपये इतका स्वस्त मिळत आहे. पण जर तुम्ही या डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्ही 4,000 रुपये अतिरिक्त वाचवू शकता, ते कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

हेही वाचा: I-Phone Price : किडनी विकून देखील विकत घेता येणार नाही हा i-Phone ; किंमत आहे 390 कोटी

iPhone 14 Flipkart ऑफर

फोनसह HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 4,000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे, परंतु या ऑफरचा लाभ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांद्वारे उपलब्ध होईल. म्हणजेच 6 हजार 901 रुपयांच्या प्रोडक्ट डिस्काउंट व्यतिरिक्त तुम्ही आयफोन 14 वर 4 हजार रुपयांची अतिरिक्त बचत करून 10 हजार 901 रुपयांची मोठी बचत करू शकता. 10,901 रुपयांच्या सवलतीनंतर, iPhone 14 128GB मॉडेलची किंमत 79,901 रुपयांऐवजी 69,901 रुपये असेल.

हेही वाचा: Athiya-Rahul Wedding : खंडाळ्यात होतंय अथिया-राहुलचं लग्न, पाहा कसं आहे शेट्टी अण्णाचं शानदार फार्महाऊस

आयफोन 14 डिटेल्स

या Apple iPhone मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो A15 बायोनिक चिपसेटसह पॅक आहे. हाच प्रोसेसर कंपनीने iPhone 13 सीरीजमध्ये देखील वापरला होता. हा एक 5G स्मार्टफोन आहे आणि तुम्ही या डिव्हाइसमध्ये Jio 5G आणि Airtel 5G दोन्ही सेवांचा लाभ घेऊ शकता. फोनच्या मागील पॅनलवर दोन 12-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आणि समोर 12-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.