Auto Tips : नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये येत आहे कारसारखे फीचर, स्पर्श करताच वाजणार अलार्म! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto Tips

Auto Tips : नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये येत आहे कारसारखे फीचर, स्पर्श करताच वाजणार अलार्म!

Auto Tips : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन दुचाकी लॉन्च केली आहे. अलीकडे, लीक झालेल्या आरटीओ दस्तऐवजांमधून माहिती समोर आली होती की होंडा 23 जानेवारी 2023 रोजी ग्राहकांसाठी Honda Activa Smart लाँच करू शकते. आज दुपारी 12 वाजता होंडा कंपनीने युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करून या गाडीचे लॉंच केले.

हेही वाचा: Athiya-Rahul Wedding : खंडाळ्यात होतंय अथिया-राहुलचं लग्न, पाहा कसं आहे शेट्टी अण्णाचं शानदार फार्महाऊस

आज जाणून घेऊ काय आहेत या नव्या गाडीचे फीचर

Honda Activa Smart: ही वैशिष्ट्ये मिळतील

ग्राहकांसाठी लाँच करण्यात येणार्‍या या स्मार्ट अ‍ॅक्टिव्हा मॉडेलमध्ये तुम्हाला अनेक नवीन आणि उपयुक्त वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, जसे की आता कंपनी या स्कूटरला चोरीपासून वाचवण्यासाठी एक नवीन अँटी थेफ्ट सिस्टम देणार आहे. कंपनी होंडाच्या प्रिमियम बिगविंग मोटरसायकलमध्ये होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टीम वापरते आणि आता कंपनी अॅक्टिव्हा स्कूटरमध्ये त्याची किफायतशीर आवृत्ती आणण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा: I-Phone Price : किडनी विकून देखील विकत घेता येणार नाही हा i-Phone ; किंमत आहे 390 कोटी

यावेळी Honda त्याच्या लोकप्रिय Activa मॉडेलमध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्ट देऊ शकते. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, होंडाच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आधीच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स देतात.

हेही वाचा: Heart Health : ‘गोल्डन अवर’ म्हणजे काय? हृदविकाराच्या झटक्यानंतर का ठरतो महत्वाचा? वाचा सविस्तर

Honda Activa स्मार्ट किंमत

या Honda स्कूटरची किंमत 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, या किमतीच्या श्रेणीत, ही स्कूटर बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या Hero Maestro Edge आणि TVS Jupiter सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल.