

iPhone Duo Screen Crack Complaints Emerge Days After Launch: What Apple Says
sakal
APPLE IPHONE DUO SCREEN CRACKING ISSUE AND REPLACEMENT POLICY: जवळपास ३ लाख रुपये किंमत असलेल्या Apple च्या पहिल्या फोल्डेबल आयफोनच्या टिकाऊपणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. iPhone Duo बाजारात येऊन काही दिवस होत नाहीत, तोच फोनच्या आतील स्क्रीनला तडे जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, काही ग्राहकांना फोन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर काही तासांतच या समस्येचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारींची दखल घेत Apple ने प्रभावित ग्राहकांना फोन रिप्लेस करून देण्याची सुविधा जाहीर केली आहे.