Apple च्या पहिल्या फोल्डेबल 'iPhone Duo' चे प्री-ऑर्डर भारतात सुरू; खरेदीवर मिळतोय 7,000 रुपयांचा डिस्काउंट!

iPhone Duo Pre-Booking: 3 लाखांपासून सुरू होणारा अ‍ॅपलचा आजवरचा सर्वात महागडा स्मार्टफोन; जबरदस्त फीचर्स आणि 81,500 रुपयांपर्यंतच्या ट्रेड-इन क्रेडिटसह भारतात विक्रीसाठी सज्ज!
Apple iPhone Duo Pre-Order India Price, Offers & Features

Apple iPhone Duo Pre-Order India: Price, Offers & Features

esakal 

Updated on: 

Apple iPhone Duo: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) आपल्या पहिल्यावहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनची अधिकृत घोषणा करत टेक जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 'Apple iPhone Duo' या अत्यंत बहुप्रतिक्षित प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोनचे भारतातील प्री-ऑर्डर सुरू झाले आहेत. भारतीय ग्राहक अ‍ॅपल इंडियाचे ऑनलाइन स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअर ॲपवरून हा फोन प्री-बूक करू शकतात. या फोनची प्रत्यक्ष विक्री 23 ऑक्टोबर 2026 पासून स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.

हा स्मार्टफोन अ‍ॅपलच्या इतिहासातील आजवरचा सर्वात महागडा फोन ठरला असून, भारतातील याच्या बेस मॉडेलची किंमत 2,99,900 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग आणि इतर ब्रँड्सना थेट टक्कर देण्यासाठी अ‍ॅपलने ही नवीन क्रांती आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com