
अॅपल आणि जिओच्या भागीदारीमुळे आयफोनवर RCS मेसेजिंग सेवा उपलब्ध झाली आहे
ज्यामुळे जिओ वापरकर्त्यांना हाय रिझोल्यूशन मीडियासह मेसेजिंगची सुविधा मिळेल.
ही सेवा भारतासह ११ देशांमध्ये उपलब्ध असून, व्हॉट्सअॅपला आव्हान देणारी ठरेल.
टेक आणि टेलिकॉम क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अॅपलने रिलायन्स जिओसोबत पार्टनर्शिप करत आयफोन वापरकर्त्यांसाठी रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (RCS) मेसेजिंग सेवा आणली आहे. या भागीदारीमुळे जिओ वापरकर्त्यांना आयफोनवर आयमेसेजसारखी हाय रिझोल्यूशन मीडियासह ब्लू टिक RCS मेसेजिंग सुविधा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध होणार आहे. ही सेवा वायफाय आणि मोबाइल डेटावर सहज कार्य करेल अशी माहिती ईटीच्या अहवालातून समोर आली आहे.