'अ‍ॅपल'ने लॉंच केले चार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या भन्नाट फिचर्स

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

जगातील प्रसिध्द मोबाईल निर्मिती कंपनी अ‍ॅपलने मंगळवारी चार नवीन 5G मोबाईल स्मार्टफोनच्या लॉंचींगची घोषणा केली आहे.

न्यूयॉर्क: जगातील प्रसिध्द मोबाईल निर्मिती कंपनी अ‍ॅपलने मंगळवारी चार नवीन 5G मोबाईल स्मार्टफोनच्या लॉंचींगची घोषणा केली आहे. यामध्ये घोषणा केलेले सर्व 5G स्मार्टफोन पुढच्या पिढीच्या हायस्पीड वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात.

या नवीन स्मार्टफोनचे क्यूपर्टिनो (Cupertino) येथील अॅपलच्या मुख्यालयातून व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे लाँचींग करण्यात आहे आहे. लॉंचींगची घोषणा करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये iPhone 12, the iPhone 12 Pro, the iPhone 12 Pro Max आणि लहान iPhone 12 miniचा समावेश आहे. याशिवाय टेक कंपनीने होमपॉड मिनी स्मार्ट स्पीकरसह नवीन ऑडिओ उपकरणेही लॉंच करण्याचीही घोषणाही केली आहे. 

'आमच्यासाठी हा एक मोठा क्षण असून आम्ही खरोखरच या नवीन स्मार्टफोनसाठी उत्साहित आहोत , अशी प्रतिक्रिया आयफोन अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक (Apple CEO Tim Cook) यांनी दिली. या आठवड्यातील अॅपलचा हा दुसरी निर्मीती आहे.  

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात 5G उपलब्ध आहे अशा भागात डाउनलोड, अपलोड तसेच उच्च दर्जाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये iPhone 12 एक नवी पातळी गाठेल.  लाँच झालेले आयफोन पाच रंगात उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये काळा, पांढरा, निळा, लाल आणि हिरवा रंगाचा समावेश असणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apple launched four 5G smartphones know the features