Appleने लॉन्च केले आहे ios 16 ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

लॉकस्क्रीन कस्टमाइज करण्याची मुभा फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांना होती. आता ios 16च्या वापरकर्त्यांनाही ही मुभा असणार आहे.
ios 16
ios 16google

मुंबई : Appleचे वार्षिक विकासक संमेलन सुरू झाले असून ते १० जूनपर्यंत चालणार आहे. पहिल्याच दिवशी अॅपलने ios 16 ची घोषणा केली. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ios 15ची जागा घेईल. ios 16च्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊ या.

लॉकस्क्रीन कस्टमाइज करण्याची मुभा फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांना होती. आता ios 16च्या वापरकर्त्यांनाही ही मुभा असणार आहे. लॉकस्क्रीनवर दिसणारा फॉन्ट, अक्षरांचा रंग, बँकग्राऊंंड या सगळ्यामध्ये बदल करता येणार आहेत.

ios 16 मध्ये लाइव्ह टेक्स्टची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे वापरकर्ते व्हिडिओ पॉज करून टेक्स्टद्वारे संवाद साधू शकतात. ही सुविधा अॅपलच्या भाषांतराच्या अॅपमध्येही उपलब्ध आहे. एखाद्या भाषेतील मजकूर तुम्हाला कळत नसल्यास तो तुम्ही ऑनस्क्रीन भाषांतरित करू शकता.

अॅपल मॅप्समध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून १५ थांब्यांपर्यंत जोडले जाता येणार आहे. ट्रान्झिट कार्डमधील शिल्लक तपासण्यासाठी ट्रान्झिट नावाने नवीन फीचर लॉन्च करण्यात आले आहे. ios 16मध्ये कस्टमाइज लॉकस्क्रीनसह फोकसही ठेवता येणार आहे.

अॅपलने आपल्या वॉलेट अॅपमध्ये पे लेटर आणि स्प्लीट कॉस्टचा पर्याय दिला आहे. ऑन डिव्हाइस डिक्टेशन आणि apple share play हे फीचर्सही आणण्यात आले आहे. ios 16 मध्ये तीन नवे फीचर्स लॉन्च करण्यात आले आहेत. आता पाठवलेले संदेश परत घेता येणार आहेत. ते एडिटही करता येणार आहेत. तसेच संदेश वाचण्यासाठी ते क्रमानुसार निवडता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com