अॅपल वॉच ६, अत्याधुनिक आयपॅड सादर 

वृत्तसंस्था
Wednesday, 16 September 2020

कॅलिफोर्नियातील मुख्यालयातून व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे ही उत्पादने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सादर केली.व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे उत्पादने सादर करण्याची अॅपलची ही पहिलीच वेळ होती

क्युपर्टिनो - जगातील आघाडीच्या `अॅपल` तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नव्या उत्पादनांची मालिका मंगळवारी रात्री सर्वांसमोर सादर केली. यात अॅपल वॉच, आयपॅड आणि आयपॅड एअर या उत्पादनांचा समावेश आहे. मात्र बहुचर्चित आयफोनचे नवे मॉडेल आज सादर करण्यात आले नाही. 

कॅलिफोर्नियातील मुख्यालयातून व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे ही उत्पादने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सादर केली. व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे उत्पादने सादर करण्याची अॅपलची ही पहिलीच वेळ होती. टिम कुक यांनी सुरुवातीलाच कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीचा उल्लेख केला. यातील काही उत्पादने लगेच तर काही येत्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने अमेरिकेत उपलब्ध होणार आहेत.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अॅपल वॉच 
अॅपल वॉच ३, एसई आणि सीरीज ६ अशी तीन उत्पादने सादर केली. अॅपल वॉच ३ हे आतापर्यंतचे सर्वांत स्वस्त उत्पादन आहे. 
अॅपल वॉच ३ - किंमत १९९ डॉलर (सुमारे १४५०० रुपये) 
अॅपल वॉच एसई - किंमत - २७९ डॉलर (सुमारे २०५०० रुपये) 
अॅपल वॉच सीरीज ६ - किंमत ३९९ डॉलर (सुमारे २९,३०० रुपये) 
वैशिष्ट्ये - यूवन अल्ट्रावाईड बँड, ५ गिगाहर्ट्झ वायफाय, इसीजी अॅप, वेदरफोरकास्ट, ब्लड ऑक्सिजन सेन्सर, फेस शेअरिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्वीम प्रूफ, हार्ट मॉनिटर, 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपॅड ४ ः ८ जनरेशन 

१०.२ रेटिना डिस्प्ले 
फुल साईज स्मार्ट की - बोर्ड 
ए-१२ बायोनिक चिपचा वापर 
आधीच्या आयपॅडपेक्षा ४० टक्के वेगवान 
अॅपल पेन्सिलचा वापर, 
आपल्या हाताने लिहिलेला मजकूर दुसऱ्या अॅपवर डायरेक्ट पेस्ट करता येणार 
८ मेगापिक्सल रियर कॅमेरा 
फेसटाइम एचडी कॅमेरा, एलटीई सपोर्ट 
१० तासांचा बॅटरी बॅकअप 
स्मार्ट कनेक्टर, यूएसबी सी 
किंमत - ३२९ डॉलरपासून (सुमारे२४,२०० रुपये) 
विद्यार्थ्यांसाठी - २९९ डॉलरपासून (सुमारे २२, ००० रुपये) 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयपॅड एअर 
१०.२ लिक्विड रेटिना डिस्प्ले 
२३६०*१६४० रेझोल्युशन 
ए-१४ बायोनिक चिप 
यूएसबी सी पोर्ट 
फ्रंट कॅमेरा - ७ मेगापिक्सेल 
बॅक कॅमेरा - १२ मेगापिक्सेल 
मॅजिक की बोर्ड 
वायफाय ६ 
किंमत - ५०० डॉलरपासून (सुमारे ३६,८०० रुपये) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apple launches ipad watch series 6 ipad air