esakal | ...तर हेडफोन आणि चार्जरशिवाय मिळणार iPhone; नव्या ग्राहकांना बसू शकतो फटका
sakal

बोलून बातमी शोधा

apple iphone

ऍपल तर्फे पुढच्या महिन्यात आयफोन 12 हा अपग्रेडेड फोन बाजारात उलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र हा फोन घेणाऱ्यांना केवळ फोनच हातात मिळेल त्याबरोबर येणारे चार्जर आणि हेडफोन नाही. 

...तर हेडफोन आणि चार्जरशिवाय मिळणार iPhone; नव्या ग्राहकांना बसू शकतो फटका

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : आताच्या घडीला आयफोन या ऍपलच्या कम्पनीचा स्मार्टफोन ठेवणाऱ्याला श्रीमंतांच्या श्रेणीत मानले जाते. केवळ स्टेटससाठी युवा वर्ग हवी ती किंमत मोजण्यास तयार असते. तसेच या स्मार्टफोनची निर्माती करणारी ऍपल कम्पनी सुद्धा वेळोवेळी आयफोनचे अपग्रेडेड व्हर्जन काढून त्यांना घेण्यासाठी आकर्षित करत असते. मात्र एक परफेक्ट स्मार्टफोन म्हणून ओळख असलेल्या या आयफोन घेताना नक्कीच विचार करण्याची गरज पडू शकते. याचे कारण म्हणजेच ऍपल तर्फे पुढच्या महिन्यात आयफोन 12 हा अपग्रेडेड फोन बाजारात उलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र हा फोन घेणाऱ्यांना केवळ फोनच हातात मिळेल त्याबरोबर येणारे चार्जर आणि हेडफोन नाही. 

बसला ना धक्का....
ऍपल आता फोन बरोबर चार्जर,लाईटनिंग केबल तसेच हेडफोन देणार नाही असे सांगण्यात येत आहे. आयफोनच्या डब्ब्यात फक्त आयफोनच या व्यतिरिक्त कोणतेच इतर ऍक्सेसरीज मिळणार नाही. जर तुम्हाला हा फोन चार्ज करायचा किंवा गाणे ऐकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आणखीन पैसे मोजावे लागणार आहेत.

हे वाचा - Apple Days चा सेल! iPhone पहिल्यांदाच स्वस्तात मिळणार

यामुळे घेण्यात आला हा निर्णय
बहुतांश आयफोन वापरकर्ते आपला जुना आयफोन अपग्रेड करत नवीन डिव्हाईस घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आधीचेच चार्जर आणि हेडफोन असतात व त्यांना नवीन चार्जर आणि हेडफोनची गरज पडत नाही. असे म्हणले जात आहे की अश्या प्रकारे बचत करून कम्पनी नव्या डिव्हाईसच्या किंमती पण कमी करू शकते. इलेक्ट्रॉनिक वेस्टशी संबंधित माहितीनुसार प्रत्येकवर्षी सुमारे तीन लाख टन केबल व इतर फोन संबंधित ऍक्सेसरीजचा कचरा जमा होत आहे. तसेच या ई-वेस्टला कमी करण्यासाठी फोन सोबत चार्जर आणि हेडफोन न देणे हा पर्याय ठरू शकतो.

हे वाचा - स्मार्टफोनच्या चार्जिंगची समस्या होणार दूर, फक्त 13 मिनिटात बॅटरी फुल

आता आयफोन 12 जरी 5 जी स्पीड आणि पावरफुल प्रोसेसर, चांगला कॅमेरा सारख्या गोष्टींनी परिपूर्ण असले तरी ऍपलद्वारे घेण्यात आलेला हा निर्णय कितपत ग्राहकांकडून।स्वीकारला जाईल याची शंका आहे.
 

loading image