स्मार्टफोनच्या चार्जिंगची समस्या होणार दूर, फक्त 13 मिनिटात बॅटरी फुल

realme fast charger battery
realme fast charger battery

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यासोबतच स्मार्टफोनच्या चार्जिंगची समस्याही भेडसावत असते. यापासून मोबाइल युजर्सची सुटका व्हावी यासाठी ओप्पो नंतर रिअलमीनेसुद्धा फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी लाँच केली आहे. 125 वॅटची फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी Ultra Dart अशी आहे. यामध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी 3 मिनिटात जवळपास 33 टक्के चार्ज होते. तर पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 20 मिनिटे लागतात. कंपनीने याआधी 65 वॅट डार्ट चार्जिंग लाँच केले होते. रिअलमी X50 Pro 5G मध्ये ही टेक्नॉलॉजी मिळते. आता कंपनीने 125 वॅट चार्जिंग वापरून 5 जी स्मार्टफोनच्या बॅटरीची समस्या दूर करण्याची तयारी केली आहे.

फास्ट चार्जिंगसाठी कंपनीने खास थ्री वे चार्जिंग सोल्यूशनचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान व्होल्टेजला कमी करून चार्जिंग पॉवर वाढवते. यामध्ये हीटही कमी ठेवली जाते. कंपनीने माहिती देताना सांगितलं की, थ्री वे सोल्यूशन आणि पूर्ण चार्जिंग प्रोसेसला कुलिंगसाठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे. तसंच 98 टक्के अल्ट्रा हाय कन्व्हर्जन रेट ऑफर केली आहे. 

कंपनीकडून असाही दावा केला जात आहे की, नव्या टेक्नॉलॉजीमुळे फोनचं तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या आता राहिलं आणि सुरक्षितपणे चार्जिंग होईल. तसंच तापमान नियंत्रण न करता 125 वॅट अल्ट्रा डार्ट टेक्नॉलॉजीमुळे फोनची बॅटरी 20 मिनिटांऐवजी 13 मिनिटात चार्ज होईल. 

नव्या टेक्नॉलॉजीमध्ये खास मल्टी लेअर प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे चार्जिंगशी संबंधित दुर्घटनेचा धोका कमी होतो. रिअलमीने सांगितले की, 125 वॅट अल्ट्रा डार्ट फोन तेव्हासुद्दा चार्जिंग होतो ज्यावेळी स्क्रीन ऑन राहते. तसंच डिव्हाइसमध्ये गेमिंगवेळीही चार्जिंग होते. कंपनीने 125 वॅट अल्ट्राडार्ट फ्लॅश चार्जिंगला ग्लोबली लाँच केलं मात्र ब्रँडने याच्याशी संबंधित माहिती अजुनही दिलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com