Apple प्रेमींसाठी वाईट बातमी! कंपनीने वाढवल्या 11 प्रॉडक्ट्सच्या किंमती; येथे पाहा नव्या किंमत

Apple
Appleesakal

Apple ने अलीकडेच नवीन iPad मॉडेल्स - 10.9-इंच iPad आणि iPad Pro ची घोषणा केली आहे.आयपॅड लॉन्च झाल्यानंतर लगेचच अॅपलने इतर काही आयपॅड मॉडेल्सच्या किमती वाढवली. एवढेच नाही तर या ब्रँडने अलीकडे काही उत्पादने आणि अॅक्सेसरीजच्या किमतीही गुपचूप वाढवल्या आहेत. आता जवळजवळ प्रत्येक Apple वॉच बँडची किंमत वाढली आहे. येथे आपण सर्व प्रॉडक्ट्स आणि अॅक्सेसरीजची यादी पाहणार आहोत आणि त्यांच्या नवीन किमतीत झालेली वाढ पाहणार आहोत.

1. Apple iPad mini: 3,000 रुपयांनी महाग

iPad mini हा सर्वात लहान आयपॅड आहे. आयपॅड मिनीची किंमत आधीची 46,900 रुपये होती. मात्र, आता तो 49,900 रुपयांना विकला जात आहे.

2. Apple iPad Air: 5,000 रुपयांने वाढली किंमत

Apple ने 2022 मध्ये M1 चिपसह iPad Air सादर केला होता. iPad Air ची आधीची किंमत 54,900 रुपया होती. आयपॅड एअरची किंमत आता 59,900 रुपयांपासून सुरू होते.

3. Apple iPad (9th-gen)

या डिव्हायसच्या एंट्री-लेव्हल मॉडेलची किंमत 3,000 रुपयांनी वाढली आहे आणि iPad (9th-gen) ची किंमत आता 33,900 रुपयांपासून सुरू होते.

4. iPhone SE (2022)

iPhone SE 3 6,000 रुपयांनी माहगला आहे याच्या 64GB व्हेरिएंटची किंमत आता 49,900 रुपये आहे, तर 128GB व्हेरिएंटची किंमत 54,900 रुपये आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपये आहे.

5. ​Apple AirTag: 300 रुपयांनी महागला

अॅपलचे ट्रॅकिंग डिव्हाइस AirTag(सिंगल पीस) ची किंमत आधीपेक्षा 300 रुपयांनी वाढली आहे .आता ते 3,490 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

6. Apple AirTag pack of four: किंमत 1000 रुपयांनी वाढली

किंमती वाढल्यानंतर वाढल्यानंतर तुम्हालाचार एअरटॅगचा पॅक 11,900 रुपयांना मिळेल. यापूर्वी त्याची किंमत 10,900 रुपये होती.

Apple
Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

7. Apple Watch Band Solo Loop: 600 रुपयांनी महाग

सोलो लूप बँडची किंमत पूर्वी 3,900 रुपये होती , परंतु आता त्याची किंमत 4,500 रुपये आहे.ग्राहक हा बँड सकुलंट, सनग्लो, चॉक पिंक, मिडनाईट, स्टॉर्म ब्लू आणि स्टारलाईट कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.

8. Apple Watch Braided Loop Band: 1600 रुपयांनी महागला

ब्रेडेड लूप बँड रेनफॉरेस्ट, स्लेट ब्लू, प्रॉडक्ट (रेड), बेज, मिडनाईट, ब्लॅक युनिटी तसेच प्राइड एडिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बँडची किंमत आता 9,500 रुपये आहे.

9. Apple Watch Sport and Sport Loop bands: 600 रुपयांनी महाग

या दोन्ही बँडची किंमत 3,900 रुपये होती, आता या दोन्ही बँडची किंमत 4,500 रुपये आहे. स्पोर्ट बँड एल्डरबेरी, स्लेट ब्लू, सक्यूलेंट, प्रॉडक्ट (लाल), पांढरा आणि ब्लॅक युनिटी कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे .

Apple
Airtel 5G vs Jio 5G: कोण देईल चांगली सेवा? दोन्हीत नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

10. Apple Watch Nike Bands: 600 रुपये महाग

'रेग्युलर' स्पोर्ट आणि स्पोर्ट लूप बँड्सप्रमाणे, Nike व्हेरियंटची किंमत देखील आता 4,500 रुपये आहे.

11. Apple Watch Leather Band

लेदर बँडची किंमत 1,600 रुपयांनी वाढली आहे आणि आता त्याची किंमत 9,500 रुपये आहे.हे एम्बर, इंक, मिडनाईट, अंबर मॉडर्न, इंक मॉडर्न आणि अझर मॉडर्न कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com