Apple Wonderlust Event : नवीन आयफोन 'अ‍ॅपल'ला तारणार का? iPhone 15 कडून कंपनीला मोठ्या अपेक्षा

iPhone 15 Launch : आज रात्री 10.30 वाजता अ‍ॅपलच्या वाँडरलस्ट इव्हेंटला सुरुवात होईल.
iPhone 15 Launch
iPhone 15 LauncheSakal

Apple Product Launch : अ‍ॅपल कंपनीचा एक मोठा इव्हेंट आज पार पडणार आहे. यामध्ये कंपनी आपल्या नवीन उत्पादनांसोबत, आयफोनची नवीन सीरीज देखील लाँच करणार आहे. या नव्या iPhone 15 सीरीजकडून कंपनीला मोठ्या अपेक्षा आहेत.

मार्केटमध्ये परतण्याचं आव्हान

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोरोना व्हायरस आणि इतर कारणांमुळे स्मार्टफोन मार्केटला मोठा फटका बसला आहे. वाढती महागाई आणि आर्थिक संकटांमुळे यावर्षी स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सची मागणी घटली आहे. सगळ्याच कंपन्यांना याचा फटका बसतो आहे.

iPhone 15 Launch
iPhone 15 Update : लाँच केल्यानंतर लगेच विक्रीसाठी उपलब्ध होईल 'मेड-इन-इंडिया' आयफोन-15; रिपोर्टमध्ये दावा

आयफोनकडून अपेक्षा

अ‍ॅपलही मार्केटमध्ये पुन्हा येऊन जोरदार मुसंडी मारण्याची तयारी करत आहे. यासाठी अर्थातच 'आयफोन' हे अ‍ॅपलचं प्रमुख शस्त्र असणार आहे. अ‍ॅपलच्या कमाईचा सर्वाधिक (48.5 टक्के) भाग हा आयफोनच्या विक्रीमधून येतो. त्यानंतर इतर सेवा (25.9 टक्के), वेअरेबल्स (10.1 टक्के), मॅक (8.4 टक्के) आणि आयपॅड (7.1 टक्के) यांचा क्रमांक लागतो.

आयफोनमध्ये युनिक फीचर्स

गेल्या काही वर्षांपासून कंपनीने आपल्या आयफोन्समध्ये, विशेषतः टॉप मॉडेल्समध्ये एक्सक्लुझिव्ह फीचर्स देण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे यूजर्सचा टॉप मॉडेल्स घेण्याकडे कल वाढला आहे. अ‍ॅपलचे आयफोन्स हे इतर स्मार्टफोनच्या तुलनेत युनिक फीचर्स देत असल्यामुळे देखील कित्येक यूजर्स आयफोनकडे वळत आहेत. ज्यांना अँड्रॉईड वापरणं सोडायचं नाही, असे लोकही सेकंडरी स्मार्टफोन म्हणून आयफोन घेत आहेत.

iPhone 15 Launch
iPhone : आयफोनचे इतके चाहते का आहेत? असं काय आहे जे Android मध्ये नाही; जाणून घ्या सविस्तर

यूएसबी-सी दुधारी तलवार

आयफोन-15 मध्ये यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट असणार हे कित्येक मीडिया रिपोर्ट्समधून कन्फर्म सांगण्यात येत आहे. याचा फायदा म्हणजे अधिकाधिक नवीन यूजर्स आयफोनकडे वळू शकतात. मात्र, ज्यांनी आधीपासूनच जुन्या आयफोनच्या लाईटनिंग चार्जिंग केबलवर खर्च केला आहे, ते यूजर्स मात्र यामुळे नाराज होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये विक्रीचं आव्हान

अ‍ॅपलसमोर या लाँचनंतर एक मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे चीनमध्ये नवीन प्रॉडक्ट्सची विक्री करणं. चीन ही अ‍ॅपलची एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये अमेरिकी उत्पादनांनाविरोधात लाट आली आहे. त्यामुळे चीनमधील यूजर्स नवीन आयफोन 15 ला खरेदी करतात की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

iPhone 15 Launch
iPhone 15 Features : लाँचची तारीख जाहीर झाली अन् काही तासांतच 'आयफोन 15' चे फीचर्स लीक! जाणून घ्या

फेस्टिव्ह सीजनचा फायदा

ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर हे तीन महिने फेस्टिव्ह सीजन मानले जातात. भारत, चीन आणि कित्येक देशांमध्ये या काळात भरपूर सण-उत्सव साजरे केले जातात. दिवाळी, ख्रिसमस, न्यू ईयर अशा कित्येक उत्सवांवेळी लोकांचा नवीन गोष्टी खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे या फेस्टिव्ह सीजनचा अ‍ॅपलला फायदा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com