Apple Vision Pro : हे फक्त बंगळुरूमध्येच शक्य.. रस्त्यावर फिरताना दिसला 'व्हिजन प्रो' यूजर; नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया!

Vision Pro Price : अ‍ॅपल व्हिजन प्रोची किंमत सुमारे 2.8 लाख रुपये एवढी आहे. यामधील हायटेक फीचर्स हा चर्चेचा विषय आहे.
Apple Vision Pro
Apple Vision ProeSakal

Apple Vision Pro User in Bengaluru : काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलने आपले व्हिजन प्रो या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेडसेटची विक्री सुरू केली आहे. सध्या केवळ अमेरिकेत याची विक्री सुरू आहे. यानंतर संपूर्ण जगभरात याची चर्चा सुरू आहे. यातच भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये देखील एक 'व्हिजन प्रो' यूजर दिसून आल्यामुळे नेटिझन्स चकित झाले आहेत.

एक्सवर (ट्विटर) व्हायरल होत असलेला हा फोटो वरुण माय्या या तरुणाचा आहे. आपले व्हिजन प्रो हेडसेट खऱ्या जगात कसे काम करतात हे तपासण्यासाठी तो हे घालूनच बंगळुरूतील इंदिरानगरमध्ये फिरत होता. यावेळी आयुष प्रणव नावाच्या तरुणाने त्याचा फोटो टिपला, आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

"इंदिरानगरच्या रस्त्यांवर वरुण आपल्या व्हिजन प्रोसोबत खेळताना दिसला. ही नक्कीच एक 'पीक बंगळुरू' मूमेंट आहे." असं आयुषने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. नेटिझन्स यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. (Peak Bengaluru Moment)

Apple Vision Pro
Apple Vision Pro: आता टीव्ही होणार बंद? अ‍ॅपलचं नवीन डिव्हाईस पाहून आनंद महिंद्रांचं भाकित; व्यक्त केली मोठी भीती

मी तर पळून जाईल..

एका एक्स यूजरने हा फोटो पाहून म्हटलं, की "मी रस्त्याने जात असताना कोणी व्हिजन प्रो घातलेली व्यक्ती समोर दिसली; तर मी तिथून पुढच्या सेकंदाला पळून जाईल." तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं की "आता डोळ्यांच्या डॉक्टरांनी तयारीत राहणं गरजेचं आहे.."

रस्त्यांवरचे खड्डे सांभाळून..

काही यूजर्सनी वरुणला रस्त्यावरुन नीट चालण्याचा सल्लाही दिला. "हे कोरमंगला भागात ट्राय करू नको, तिथे रस्त्यांवर खूप खड्डे आहेत" असं एका यूजरने म्हटलं. तर "हे हेडसेट काढून घेऊन कोणी पळून गेलं तर काय करणार?" असा प्रश्नही एका यूजरने विचारला आहे.

Apple Vision Pro
Apple Vision Pro च्या निमित्ताने लोकांना कळली तंत्रज्ञानाची दुःखद बाजू; माणसंच माणसांपासून होतायत दूर

व्हिजन प्रो चर्चेत

अ‍ॅपल व्हिजन प्रोची किंमत (Apple Vision Pro Price) सुमारे 2.8 लाख रुपये एवढी आहे. यामधील हायटेक फीचर्स हा चर्चेचा विषय आहेच. मात्र या हेडसेटमुळे व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा अनुभव खऱ्या जगात कोणकोणत्या गोष्टींसाठी घेता येऊ शकतो हेदेखील पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे. यामुळे विविध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व्हिजन प्रो हेडसेट वापरून दैनंदिन कामे करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com