Apple Vision Pro च्या निमित्ताने लोकांना कळली तंत्रज्ञानाची दुःखद बाजू; माणसंच माणसांपासून होतायत दूर

तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं हे आपण वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
Apple Vision Pro
Apple Vision ProEsakal

अ‍ॅपलने WWDC 2023 कार्यक्रमात आपले व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केले. या हेडसेटची प्रतिक्षा टेक फॅन्स कित्येक वर्षांपासून करत होते. खऱ्या जगात डिजिटल इमेजरी प्रोजेक्ट करू शकणारे हे हेडसेट (Apple Vision Pro) तंत्रज्ञानाच्या युगातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र, यामुळेच टेक्नॉलॉजीच्या आहारी जाण्याची दुःखद बाजूही लोकांनी समोर आणली आहे.

अ‍ॅपलने या हेडसेटचे फीचर्स दाखवणारा एक व्हिडिओ कार्यक्रमात सादर केला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही दैनंदिन जीवनात कुठे कुठे हा हेडसेट वापरू शकाल हे विविध सीन्सच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. यात हेडफोनच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचरची माहिती देताना जो सीन दाखवण्यात आला, तो आता ट्विटरवर व्हायरल होतो आहे.

Apple Vision Pro
Apple Vision Pro : हॉलिवूडपटातील टेक्नॉलॉजी उतरली सत्यात! अ‍ॅपलने लाँच केला हेडसेट, पाहा व्हिडिओ

काय आहे सीन?

यामध्ये असं दाखवलंय, की दोन लहान मुली घरात खेळत आहेत आणि त्यांचे वडील त्याठिकाणी व्हीआर हेडसेट घालून बाजूला उभे आहेत. खरंतर, अ‍ॅपलला असं दाखवायचं आहे की ते वडील या मुलींचा थ्री-डी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. ज्याप्रमाणे आपण आता आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्याप्रमाणेच हे वडील आपल्या मुलींचा थ्री-डी व्हिडिओ घेत आहेत. जेणेकरून, या आठवणी कॅमेऱ्यात कैद होतील.

दुःखद गोष्ट

मात्र, नेटिझन्सनी या गोष्टीची दुःखद बाजू दाखवून दिली आहे. तुम्ही जरी एक पालक म्हणून मुलांचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद करत असाल, तरी मुलांच्या दृष्टीकोनातून या दृश्याकडे पाहणंही गरजेचं आहे. मुलांसाठी मात्र तुम्ही एक अशी व्यक्ती असणार आहात, जी कायम एक व्हीआर हेडसेट घालून बसली आहे. मुलांसोबत हा वेळ एंजॉय करायचा सोडून, तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये रमलेले दिसाल, असं मत काही ट्विटर यूजर्स व्यक्त करत आहेत.

दुसऱ्या एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे, की आनंदांच्या क्षणाचे थ्री-डी व्हिडिओ रेकॉर्ड करणं ही नक्कीच मोठी बाब असेल. मात्र, आपल्या मुलांच्या बर्थडे वेळी, किंवा आनंदाच्या क्षणी घरातील इतर लोक एंजॉय करत असताना वडिलांनी असं रोबोट सारखं बसणं नक्कीच चांगली गोष्ट नाही.

Apple Vision Pro
WWDC 2023 : अ‍ॅपलच्या वॉचमध्ये आले नवीन फीचर्स, मानसिक आरोग्यावर देणार विशेष लक्ष

लोक होतील एकलकोंडी

साचा जुड नावाच्या एका ट्विटर यूजरने म्हटलं, की कुटुंबीयांसोबत असताना वडिलांनी हेडसेट घालून बसणं, तुमचे फ्लॅटमेट्स टीव्ही पाहत असताना तुम्ही हेडसेट लावून 4K मूव्ही पाहणं, ऑफिसमध्ये इतरांशी बोलण्याऐवजी हेडसेट लावून बसणं अशा गोष्टींमुळे लोक एकलकोंडी होऊ शकतात.

एकूणच तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेतच. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं हे आपण वेळीच ओळखणं गरजेचं आहे. सध्या हा व्हीआर हेडसेट बाजारात उपलब्ध झाला नसला, तरीही आपल्याला मोबाईलमध्ये अशाच प्रकारे गुंतलेले अनेक लोक आजूबाजूला दिसतात. मुलांच्या मोबाईल वापरण्याला आळा घालणाऱ्या पालकांनी, आपणही किती प्रमाणात मोबाईल वापरतो याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com