
Apple Watch Saved Life : आश्चर्य! स्मार्टवॉचने वाचवला गर्भवती महिलेचा जीव, ठरली देवदूत
Apple Watch Saved Life : ॲप्पल वॉच भारतासह जगभरात खूप लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नाही तर त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्य वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक प्रकरणांमध्ये या वैशिष्ट्यांमुळे लोकांचे प्राण वाचले आहे.
ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज मागोवा घेता येतो आणि वेळेत मोठा निर्णय घेता येतो आणि जीवही वाचू शकतो. अलीकडेच गर्भवती महिलेसोबतही असेच घडले. महिला आणि तिच्या मुलासाठी ही वॉच देवदूतच ठरली आहे.
काय आहे प्रकरण
वास्तविक ही गर्भवती महिला ॲप्पल वॉच वापरते. जेसी केली असे या महिलेचे नाव आहे. एक दिवस अचानक या महिलेच्या हृदयाच्या गतीमध्ये असामान्यता दिसली, त्यानंतर ॲप्पल वॉचने या महिलेला याबाबत अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या महिलेने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा हा प्रकार ॲप्पल वॉचमधून महिलेला वारंवार पाठवण्यात आला, तेव्हा त्या महिलेला हे लक्षात घेण्यासारखे वाटले.
हेही वाचा: Budget Friendly Smartwatchs: स्वस्तात मस्त हेल्थ फीचर्ससह परवडणारे ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच, किंंमत...
रूग्णालयात उलगडलं धक्कादायक सत्य
रूग्णालयात पोहोचल्यावर महिलेला मोठा धक्काच बसला. खरं तर, या महिलेचे ॲप्पल वॉच तिला तिच्या असामान्य हृदय गतीबद्दल सतत सांगत होते, ज्यामध्ये तिच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 120 बीट्स पेक्षा जास्त होते.
जेव्हा महिलेच्या हे लक्षात आले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा लक्षात आले की खरोखर काहीतरी गडबड आहे. महिलेला प्रसूती होत असल्याची आणि गर्भावस्थेत काहीतरी समस्या येत असल्याची माहिती हॉस्पिटलमध्ये मिळाली होती.
एवढेच नाही तर त्या महिलेचा रक्तदाब कमी होत होता आणि त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. ऍपल वॉचने या महिलेला योग्य वेळी अलर्ट पाठवून दिलेल्या माहितीमुळे ही महिला आता सुरक्षित असून तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. त्याचे नाव मेरी ठेवण्यात आले आहे.