Apple या वर्षी लाँच करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स; पाहा संपूर्ण यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

Apple या वर्षी लाँच करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स; पाहा संपूर्ण यादी

Apple कंपनीच्या सर्वच प्रोडक्ट्सचे जगभरात चाहते आहेत, लोक त्यांच्या लॉंचची कित्येक दिवसांपासून वाट पाहातात या दरम्यान, Apple ग्राहकांसाठी काही महत्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत. काही लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार Apple यावर्षी त्यांचे अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या यादीत त्यांची नवीन आयफोन सीरीज, मॅकबुक मॉडेल्स, एअरपॉड्स, ऍपल वॉच, आयपॅड इत्यादींचा समावेश असणार आहे.

तसेच नवीन iPhone 14 सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max यांचा समावेश असू शकतो. याशिवाय कंपनी MacBook Pro, iMac मोठ्या डिस्प्लेसह, Mac Pro आणि नवीन डिझाइनसह MacBook Air लॉंच करु शकते. याशिवाय कंपनी अॅपल वॉच, कमी किमतीचे आयपॅड आणि नवीन आयपॅड प्रो मॉडेल्सही सादर करू शकते.

MacRumors च्या रिपोर्टनुसार, Mark Gurman चा हवाला देऊन, अशी माहिती देण्यात आली आहे की, Apple कंपनी सध्या अनेक नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकतात. मार्क गुरमनने त्यांच्या ताज्या "पॉवर ऑन" पत्रिकेत माहिती दिली आहे की, Apple चार नवीन iPhones वर काम करत आहे, ज्यात iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असेल. स्मार्टफोन व्यतिरिक्त, कंपनी मॅकबुक प्रो, मोठ्या स्क्रीनसह आयमॅक, नवीन मॅक प्रो आणि रीडिझाइन केलेले मॅकबुक एअर देखील आणेल.

हेही वाचा: कोरोना काळात PF खात्यातील पैसे हवेत? घरी बसून होईल काम; पाहा प्रोसेस

याशिवाय Apple सेकंड जनरेशन AirPods Pro, तीन नवीन Apple Watch, स्वस्त iPad आणि नवीन iPad Pro व्हेरिएंट आणणार आहे. ऍपल वॉचबद्दल बोलायचे झाले तर यात सीरीज 8, एसई आणि रग्ड वॉचचा समावेश असू शकतो. अॅपलची बहुतेक नवीन उत्पादने वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकतात, परंतु त्यापूर्वी iMac लाँच होण्याची अपेक्षा आहे. Apple कंपनी मार्च किंवा एप्रिलमध्ये स्प्रिंग इव्हेंट आयोजित करणार आहे, ज्यामध्ये iPhone SE 5G आणि iPad Air सादर केले जाऊ शकतात.

Apple चा AR/VR हेडसेट देखील आजकाल चर्चेत आहे, असे सांगितले जात आहे की हे डिवाइस 2023 पर्यंत लॉन्च केला जाऊ शकते.

हेही वाचा: jio चे स्वस्तात मस्त प्लॅन; मिळतो 1.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग

Web Title: Apple Will Launch These New Products This Year Check List Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :apple
go to top