Apple Health Watch : अ‍ॅपलने दिली खुशखबर! बनवणार ब्लड प्रेशर अन् रक्तातील साखर मोजणारं स्मार्टवॉच, किंमत फक्त...

Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Feature : अ‍ॅपल कंपनी त्यांच्या नव्या Apple Watch मध्ये ब्लड शुगर मॉनिटरींग फीचर समाविष्ट करण्यावर काम करत आहे. याच्या सर्व डिटेल्स सविस्तर जाणून घ्या.
Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Feature
Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Featureesakal
Updated on

अ‍ॅपल कंपनीने आपल्या Apple Watch मध्ये नॉन इन्फेसीव ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग फीचर विकसित करण्यावर अनेक वर्षांपासून काम सुरू केलं आहे. मात्र रिपोर्ट्सनुसार, ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठी अजून काही वर्षे लागण्याची शक्यता आहे.

हे प्रोजेक्ट अ‍ॅपलच्या संस्थापक Steve Jobs च्या कार्यकाळात सुरू झालं होतं, २०१० मध्ये कंपनीने RareLight नावाच्या ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग स्टार्टअपला खरेदी केलं होतं. त्यानंतर, अ‍ॅपलने यावर गुप्तपणे काम सुरू केलं आणि CEO Tim Cook आणि इतर अधिकारीही प्रकल्पात सक्रियपणे सामील झाले आहेत.

या प्रोजेक्टला "Project E5" असं कोडनेम दिलं आहे, ज्यात ऑप्टिकल सेंसर्सचा वापर करून त्वचेतून लाइट सोडून ग्लुकोजचे प्रमाण मोजलं जातं. मात्र, याची सर्वात मोठी अडचण म्हणजे टेक्नोलॉजीला Apple Watch मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याला मिनियटरीझ करणे, जे अजूनही शक्य झालं नाही. २०२३ मध्ये एक प्रोटोटाइप तयार झालं असलं तरी, तो सध्या स्मार्टवॉचमध्ये फिट होण्याजोगा नाही.

Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Feature
Sunita Williams : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्सचं उत्तर ऐकून गर्वाने ऊर भरून येईल

अ‍ॅपलने ब्लड ऑक्सिजन आणि ब्लड प्रेशर सेंसर्ससाठीही अडचणींचा सामना केला आहे. जरी ब्लड शुगर मॉनिटरींग फीचर अनेक वर्षांपासून विकसित केलं जात असलं तरी, मार्क गुरमन यांच्या मते, हे फीचर अजून काही वर्षे नंतर येणार आहे.

तथापि, अ‍ॅपलचे इतर आरोग्यविषयक फीचर्स सुस्पष्टपणे पुढे जात आहेत. कंपनी iPhone वर "व्हर्च्युअल हेल्थ कोच" फीचर विकसित करत आहे, जो iOS १९ मध्ये समाविष्ट होईल. या AI आधारित प्रणालीचा उद्देश यूझर डेटा वापरून आरोग्य संबंधित सल्ले देणे आहे.

Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Feature
Apple कंपनीचा धमाका! iPhone 16e भारतात लाँच; iPhone 16 पेक्षा अर्धी किंमत, नवे फीचर्स अन् iOS 18, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकवर

याशिवाय अ‍ॅपलनवीन फिचर्समध्ये फूड ट्रॅकिंगची सुविधा देखील समाविष्ट करणार आहे. ज्यामुळे यूझर्स त्यांच्या आहाराचे ट्रॅकिंग करू शकतील आणि AI च्या मदतीने आहारविषयक माहिती मिळवू शकतील.

तसेच अ‍ॅपलने विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ञांना देखील त्याच्या AI प्रणालीला अधिक अचूकतेने तयार करण्यासाठी नियुक्त केले आहे. याची किंमत 50 हजार ते 60 हजार पर्यंत असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com