
घरबसल्या मिळतं रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया
सरकारच्यावतीने देण्यात येणारं धान्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असतं. याशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही याची गरज असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरीबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. यामध्ये अनेक राज्यांकडून मोफत धान्य दिलं जात आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात रेशन कार्ड नसेल तरीही सरकारकडून धान्य देण्यात येतंय. तर इतर ठिकाणी रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला ते घरबसल्या तयार करून घेता येतं. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. सर्व राज्यांकडून रेशन कार्डसाठी संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. रेशन कार्ड तयार करून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. सध्या उत्तर प्रदेशात अशी सुविधा आहे. तिथं https://nfsa.up.gov.in/Food/citizen/Default.aspx वरून फॉर्म डाउनलोड करता येतो. महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in या संकेतस्थळावर रेशनकार्डसाठी फॉर्म डाउनलोड करण्याची सुविधा आहे. सध्या ऑनलाइन अर्ज मात्र करता येत नाही.
हेही वाचा: महाराष्ट्रातील एकूण मृत्यू एक लाखाच्या पार; अर्धे मृत्यू दुसऱ्या लाटेतले
उत्तर प्रदेश सरकारच्या संकेतस्थळावर Apply online for ration card असा पर्याय आहे.
रेशन कार्ड तयार करण्यासाठी ओळख पत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते.
अर्जासाठी शुल्क हे 5 रुपयांपासून ते 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भऱल्यानंतर शुल्क देऊन तो अर्ज सबमिट करा.
अर्ज केल्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर तुमचा अर्ज योग्य आढळला तरच रेशन कार्ड तयार होते.
रेशन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतं
भारताचे नागरिकत्व असलेली व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे नाव त्यांच्या पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते. मात्र त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी वेगळं रेशन कार्ड मिळू शकतं.
हेही वाचा: श्रेयवादातून लॉकडाउनच्या घोषणेचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शिस्त लावावी - फडणवीस
रेशन कार्डसाठी ओळख म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांशिवाय आणखी काही कागदपत्रे लागतात. त्यामध्ये पॅनकार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून वीजबील, गॅस कनेक्शन बूक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, पासबूक, भाडे करार या कागदपत्रांची आवश्यकता असते.
Web Title: Apply For Online Ration Card Know
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..