Artemis-1 Launch : नासाच्या आर्टेमिस-1 इंजिनमध्ये बिघाड; मोहिम ढकलली पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nasa

Artemis-1 Launch : नासाच्या आर्टेमिस-1 इंजिनमध्ये बिघाड; मोहिम ढकलली पुढे

Nasa Artemis-1 Rocket Launch : नासाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र, ताज्या माहितीनुसार आता हे प्रेक्षेपण काही तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबत नासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची पुष्टी केली आहे. इंजिन क्रमांक तीनमध्ये बिघाड झाल्याने याचे प्रेक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी म्हणजेच आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता आर्टेमिस-1 चे प्रेक्षेपण होणार होते. या रॉकेटमधून सुमारे 42 दिवसांच्या मोहिमेवर क्रूशिवाय ओरियन अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची योजना होती. मात्र, प्रेक्षणापूर्वी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये जोरदार गडगडाटी वादळादरम्यान रॉकेटच्या जवळ असलेल्या लॉन्च पॅड आणि 600-फूट टॉवरवर वीज पडली. त्यामुळे या रॉकेटच्या तीन नंबर इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Jio AIRFIBER : काय आहे हे अनोखे डिव्हाइस, कसे काम करेल? जाणून घ्या सर्व काही

आर्टेमिस-1 मोहिमेमध्ये नासाच्या नवीन आणि सुपर हेवी रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय यात स्पेस लॉन्च सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी यापूर्वी कधीही वापरली गेली नव्हती. हे यान सहा अंतराळवीरांना 21 दिवस अंतराळात वाहून नेण्यास सक्षम असून, बिना क्रूशिवाय आर्टेमिस -1 मिशन 42 दिवस टिकू शकते. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे. सध्या त्यात एकही वैज्ञानिक जाणार नाहीये. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जाणार असून, नासा स्पेससूट आणि रेडिएशनचे मूल्यांकन करणार आहे. रॉकेटमधून पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉयदेखील पाठवला जाणार आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल.

Web Title: Artemis 1 Launch Launch Scrubbed Due To Engine Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NASA