

NASA Artemis II Crew Returns Safely After Historic Moon Orbit Mission
esakal
नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेतील चार अंतराळवीरांनी चंद्राच्या भोवती फिरण्याचा ऐतिहासिक प्रवास यशस्वीरीत्या संपवला असून ते पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. संस्थेने या परतीच्या क्षणांचा थरारक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात ओरियन कॅप्सूल तीन मोठ्या पॅराशूटच्या आधाराने हळूहळू खाली उतरताना आणि नंतर पॅसिफिक महासागरात भव्य पद्धतीने स्प्लॅशडाउन करताना दिसते. नासाने एक्स वरुन लिहिले की, “रीड, व्हिक्टर, क्रिस्टीना आणि जेरेमी, तुमचे घरी स्वागत आहे!” ही दहा दिवसांची मोहीम चंद्राची पूर्ण प्रदक्षिणा घालून यशस्वी झाली.