देशी बनावटीचे ‘नमस्ते भारत’

namaste-bharat-app
namaste-bharat-app

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक चिनी ॲपवर भारतात बंदी घालण्यात येत आहे. तसेच, सरकारने स्वदेशीचा नारा दिल्याने अनेकजण स्वदेशी बनावटीचे ॲप वापरण्यावर भर देत आहेत. अशा वेळी भारतातच तयार झालेले एक ॲप आले असून, ‘नमस्ते भारत’ हे ॲप सध्या खूपच लोकप्रिय आहे. हे ॲप पूर्णपणे मोफत आहे. 

‘नमस्ते भारत’ हे एक सोशल मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून आपण मित्रांसोबत चॅटिंग करू शकतो. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंग, व्हाईस कॉल, फोटो आणि व्हिडिओ शेअरही करू शकतो. या ॲपची बरीचशी फिचर्स ‘व्हॉट्‌सअप’, ‘इन्स्टाग्राम’प्रमाणे आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांसाठी हे जास्त अडचणीचे ठरत नाही. हे ॲप चार फेब्रुवारी २०१९ रोजी NxtGen Datacenterद्वारे लॉन्च केले होते. त्यावेळी ‘प्ले स्टोअर’द्वारे या ॲपला ४.५ रेटिंग मिळाले होते. या ॲपचे आतापर्यंत दहा लाखांहून अधिक डाऊनलोड झाले आहेत. सेटिंग या पर्यायातून आपल्याला हवे तसे बदल करता येतात. यामध्ये तशा सुविधा उपलब्ध असून, नोटिफिकेशन बंद किंवा चालू करणे चॅट, कॉल, लोकेशन यासंबधी अनेक सेटिंग करण्याची मुभा असल्याने वापरकर्त्याच्या गोपनीयतेला कुठलाही धोका वा बाधा पोहोचत नाही.

‘व्हॉट्‌सॲप’ला उत्तम पर्याय
‘नमस्ते भारत’ हे भारतीय बनावटीचे ॲप असून, ते ‘व्हॉट्‌सॲप’ला उत्तम पर्याय ठरत आहे. ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या ॲपच्या शोधात असणाऱ्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. ‘नमस्ते भारत’ ॲपमध्ये ‘व्हॉट्‌सॲप’पेक्षा जास्त फंक्‍शन्स आहेत. यामध्ये ५० एमबीपर्यंत व्हिडिओ पाठवता येतो. वर्ड, एक्‍सेल, तसेच ॲडॉबच्या फाईल्सही आपण याद्वारे पाठवू शकतो. ‘व्हॉट्‌सॲप’प्रमाणे ‘नमस्ते भारत’वरही  २०० जणांचा ग्रुप बनवता येतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘नमस्ते ॲप’वरून ‘झूम’प्रमाणेच व्हिडिओ कॉलसह मीटिंग लिंक तयार करता येते. तसेच ती लिंक शेअरही करता येते. याच्या मोबाइल व्हर्जनमध्ये रिअर कॅमेरा स्विच करण्याचा पर्यायही आहे. तसेच कॉल करताना फक्त ऑडिओ कॉलचीही सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मीटिंग शेड्युलसुद्धा करता येते.

ठळक वैशिष्ट्ये
    चॅट करता येते.
    व्हाईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा.
    फोटो, डॉक्‍युमेंट्‌स शेअर करण्याचा पर्याय.
    ‘व्हॉट्‌सॲप’प्रमाणे स्टेटस ठेवण्याचा पर्याय.
    दोनशे जणांचा ग्रुप बनवून प्रायव्हेट चॅटिंगचा पर्याय.
    लोकेशन शेअर करण्याचा पर्याय.
    रिसेंट पर्यायामधून इनकमिंग, आऊटगोईंग आणि मिस्डकॉलची माहिती मिळू शकते.
    प्रोफाईल फोटो ठेवण्याचा पर्यायही उपलब्ध.
    संपर्कयादीतील ॲप वापरकर्त्यांना एकाचवेळी मेसेज पाठवण्याचा पर्याय. 

‘नमस्ते भारत’ वापराच्या पायऱ्या
     पहिल्यांदा हे ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करावे.
    आपला मोबाईल क्रमांक टाकावा.
    आपले नाव आणि देशाचा योग्य पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करावी.
     मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी योग्य ठिकाणी नोंदवावा.
    मिळालेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com