‘ॲप’निंग : राखावे अंतर...तरी संवाद निरंतर

कृपादान आवळे
Saturday, 4 April 2020

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूची लागण होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘कोरोना’चा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी अंतर ठेवण्याचे भान राखा, (सोशल डिस्टन्सिंग) असे आवाहनही केले. शक्‍यतो बाहेर न जाणे आणि जावे लागल्यास ‘अंतरा’चा नियम पाळणे गरजेचे आहे. आपण आपले नातेवाईक, मित्र परिवाराला प्रत्यक्ष न भेटताही त्यांना भेटल्याचा अनुभव व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेऊ शकतो.

entertainment जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूची लागण होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘कोरोना’चा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी अंतर ठेवण्याचे भान राखा, (सोशल डिस्टन्सिंग) असे आवाहनही केले. शक्‍यतो बाहेर न जाणे आणि जावे लागल्यास ‘अंतरा’चा नियम पाळणे गरजेचे आहे. आपण आपले नातेवाईक, मित्र परिवाराला प्रत्यक्ष न भेटताही त्यांना भेटल्याचा अनुभव व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ कॉल हे फिचर किंवा त्यासाठीचे ॲप महत्त्वाचे ठरू शकते. अशाच काही व्हिडिओ कॉलिंग ॲपची माहिती घेणार आहोत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेसटाइम - हे ॲप विशेषत: ‘ॲपल’च्या वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आले आहे. तुमच्याकडे आयफोन, आयपॅड किंवा मॅक असेल, तर या ‘ॲप’च्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंगचा चांगला अनुभव घेता येऊ शकतो. हे ‘ॲप’ फक्त व्हिडिओ कॉल नाही, तर फोन कॉल किंवा संदेशाचा मजकूर यासाठीही उपयुक्त ठरते. व्हिडिओ कॉलिंगचा उत्तम अनुभव घेता यावा, यासाठीच हे ‘ॲप’ सुरू करण्यात आले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी ३२ लोकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता येऊ शकतो.

व्हॉट्‌सॲप - सोशल मीडियापैकी एक असलेल्या ‘व्हॉट्‌सॲप’चा वापर जगभरात वाढला आहे. दोन अब्ज लोकांहून अधिक लोक या ‘ॲप’चा वापर करत आहेत. सध्या या ‘ॲप’चा वापर मुख्यत: संदेशवहनासाठी केला जात आहे. हे ‘ॲप’ ‘आयओएस’ आणि ‘अँड्राइड फोन’साठी सध्या उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून संदेश, व्हिडिओ/ऑडिओ कॉल करता येऊ शकतो. हे फिचर या ‘ॲप’च्या माध्यमातून देण्यात आल्याने जगभरात याचा वापर इतर ‘ॲप’च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात होत आहे.

स्काईप - स्काईप हे ‘ॲप’ ‘आयओएस,’ ‘अँड्राइड,’ ‘विंडोज्‌’ आणि ‘मॅक’ या सिस्टिम असणाऱ्या वापरकर्त्यांना या ‘ॲप’च्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा लाभ घेता येईल. हे ‘ॲप’ वापरणे आता सोपे झाले आहे. या ‘ॲप’च्या माध्यमातून ५० लोकांशी एकाचवेळी संवाद साधता येणे शक्‍य आहे. अशी सुविधा या ‘ॲप’मध्ये देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच व्हिडिओ कॉल रेकॉर्ड, सेव्ह आणि शेअरही करता येऊ शकतो.  

मार्को पोलो - मार्को पोलो हे ‘ॲप’ व्हिडिओ मेसेज पाठविण्यासाठी महत्त्वाचे समजले जाते. आपल्याला कोणाशी व्हिडिओ चॅट करायचे असेल; पण हे लगेच करायचे नसेल तर किंवा संबंधित वापरकर्ता आपल्या कामात व्यग्र असल्यास आपण आपला व्हिडिओ संदेश एकाच व्यक्तीला किंवा गटात पाठवू शकतो.

फेसबुक मेसेंजर - फेसबुक मेसेंजर हे ‘ॲप’ प्राथमिकपणे संदेश पाठविण्यासाठी वापरले जाते. पण यामध्ये मेसेजिंगसह व्हिडिओ चॅट हा पर्यायही कंपनीकडून देण्यात आला आहे. या ‘ॲप’च्या माध्यमातून संदेश पाठविणे, व्हिडिओ/ऑडिओ कॉलसाठी सुविधा देण्यात आली आहे; पण यासाठी संबंधित वापरकर्ता फक्त ‘फेसबुक’ वापरणारा नाही, तर तो ‘फेसबुक मेसेंजर युजर’ असायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article krupadan avale on appning