गॅजेट्स : व्हॉट्सॲपचा असाही वापर

Whatsapp
Whatsapp

जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सॲपची ओळख आहे. त्यातही भारतात व्हॉट्सॲपचे जवळपास ४० कोटी ॲक्टिव्ह युजर्स आहेत. काळानुरूप बदलत जाणाऱ्या आणि यूजर्सला नवनवीन फिचर्स प्रत्येक नव्या अपडेट्समध्ये मिळत असते. त्यातही व्हॉट्सॲपचा अनोख्या पद्धतीने वापर करण्यासाठी काही खास क्लृप्त्या आहेत, त्याचा वापर कसा करावा, ते जाणून घेऊया....

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीआयएफ तयार करणे
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ॲनिमेटेड जीआयएफ फाईल्स मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जातात. आत्तापर्यंत वेगळ्यावेगळ्या प्रकारचे ॲप्स वापरून जीआयएफ फाईल्स तयार केल्या जात होत्या. मात्र आता त्यासाठी इतर कोणत्याही ॲप्सची गरज नाही, तुमच्या व्हॉट्सॅपवरूनच तुम्हाला जीआयएफ फाईल तयार करून पाठवता येते.

  • ज्या क्रमांकावर व्हिडिओची जीआयएफ तयार करून पाठवायची आहे, तो व्हिडिओ सिलेक्ट करा.
  • उजव्या बाजूला वर प्रिव्ह्यू या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ किंवा जीआयएफ हा दोन पर्याय दिसतील. 
  • त्यातून जीआयएफ निवडून संबंधित व्हिडिओमधून कोणत्याही सहा सेकंदाचा भाग जीआयएफ म्हणून कन्हर्ट करता येतो.
  • आणि तेवढा सहा सेकंदाचा भाग जीआयएफ म्हणून पाठवता येतो.

व्हॉईस मेसेज गोपनीयरित्या ऐकणे 
सध्या अनेकजण व्हॉट्सॲपवर मेसेज टाइप करून पाठवण्यापेक्षा तो व्हॉईस मेसेज स्वरूपात पाठवण्यास प्राधान्य देतात. मात्र, अनेकदा आपण कार्यालयात असतो किंवा मित्रांसोबत असतो, त्यावेळी व्हॉईस मेसेज मोठ्या आवाजात ऐकणे गैरसोयीचे वाटते आणि वेळेवर सोबत हेडफोन नसल्यास आणखीच गैरसोय होते. अशावेळीही व्हॉईस मेसेज कमी आवाजात ऐकता येणे शक्य आहे. अनेकजणांना माहिती नसलेली ही क्लृप्ती म्हणजे व्हॉईस मेसेज ऐकताना आपला मोबाईल कानाला लावायचा. ज्याप्रमाणे आपण फोन कानाला लावून बोलतो, त्याप्रमाणे व्हाईस मेसेज आपोआप कमी आवाजात ऐकता येता.

ठरावीक चॅटमधील मीडिया डिलीट करणे
व्हॉट्सॲपवर अनेकजण फोटोज, व्हिडिओज, कागदपत्रे शेअर करत असतात. अनेक ग्रुप्स तसेच वैयक्तिक चॅटिंगमध्ये अशाप्रकारे अनेक मीडिया फाईल्स साठत जाते. त्यामुळे तुमच्या मोबाईलची स्पेसही साठून राहते. अशावेळी मोबाईल मेमरीतून सरसकट सर्वच फाईल्स डिलिट करणेही शक्य नसते. ठरावीक चॅटमधून मीडिया डिलीट करणेही आता शक्य झाले आहे.

  • व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन डाटा आणि स्टोरेज पर्यायावर क्लिक करा.
  • व्हॉट्सॲपमधील प्रत्येक चॅटने किती स्टोरेज साठले आहे, ते दिसेल.
  • त्यानुसार सर्वाधिक स्टोरेज असलेले चॅटची सिलेक्ट करून ‘फ्री अप स्पेस’ पर्यायावर क्लिक करून मेमरी रिकामी करता येते.

नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲप मेसेज पाठवणे
आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेले क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सॲपद्वारे मेसेज पाठवता येत नाही. अशावेळी एखाद्या सेव्ह नसलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करता येणे शक्य आहे. त्यासाठी लॅपटॉप किंवा मोबाईलमधील ब्राऊजरमध्ये wa.me/ ९१ ९४******२२ अशाप्रकारे सर्च करून तुम्हाला त्यांच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधता येतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com