ॲप प्लस : टॉप पॅरेंट ॲप

सुवर्णा येनपुरे-कामठे
रविवार, 17 मे 2020

हल्ली लहान मुलांना हाताळायचे कसे, त्यांना शिक्षण कसे द्यायचे असे अनेक प्रश्न पालकांसमोर असतात. रोज-रोज तेच ते खेळ खेळून मुलेही कंटाळत आहेत. खेळणेही होईल आणि काहीतरी शिकायलाही मिळेल असे काहीतरी नवे खेळणे मुलाला आणून द्यावे, तर बाहेरही लॉकडाउन असल्याने घराबाहेर पडता येत नाही.

हल्ली लहान मुलांना हाताळायचे कसे, त्यांना शिक्षण कसे द्यायचे असे अनेक प्रश्न पालकांसमोर असतात. रोज-रोज तेच ते खेळ खेळून मुलेही कंटाळत आहेत. खेळणेही होईल आणि काहीतरी शिकायलाही मिळेल असे काहीतरी नवे खेळणे मुलाला आणून द्यावे, तर बाहेरही लॉकडाउन असल्याने घराबाहेर पडता येत नाही. त्यातच ३ ते ८ वयोगटातील मुलांना हाताळणे तर सर्वाधिक कठीण असते. हीच समस्या ‘टॉप पॅरेंट’ या ॲपने पालकांसाठी थोडी सोपी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुलांसोबत करता येणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटीज, खेळ, व्हिडिओच्या स्वरूपात विविध गोष्टी ‘टॉप पॅरेंट’ ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग पालक आपल्या पाल्याला हातळण्यासाठी, त्याला विविध गोष्टी शिकवण्यासाठी करू शकतात. मुलांना ३-८ वर्षे या कालावधीत व्यवस्थित शिक्षण न देऊ शकल्याने त्यांचा शैक्षणिक दर्जा घसरतो. यासाठीच हे ॲप मदत करते. या ॲपच्या संस्थापिका शाश्‍वती बॅनर्जी यांनी जागतिक कुटुंब दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सत्रात याबद्दलची माहिती दिली. यावेळी ‘टिकटॉक’चे संचालक अर्जून नारायण यांनी किशोरवयीन मुलांना हातळण्यासाठी टॉप पॅरेंट कसे मदत करू शकेल याबद्दल माहिती दिली.

काय आहे ॲपमध्ये?

  • या ॲपमध्ये विविध टिकटॉक व्हिडिओज पाहायला मिळतील. 
  • या व्हिडिओंच्या मदतीने पालकांना आपल्या पाल्यांना कसे शिकवावे याबद्दलची माहिती मिळेल.
  • या ॲपमध्ये मुलांच्या सुरक्षेचाही विचार करण्यात आला आहे. 
  • हे ॲप गेल्याच महिन्यात लॉंच करण्यात आले असून, ते विनामूल्य उपलब्ध आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article suvarna yenpure on top parent app

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: