टेक कर्मचाऱ्यांना AI चा फटका! एकट्या मे महिन्यात 4,000 लोकांनी गमावली नोकरी

यावर्षीच्या मे महिन्यात जगभरातील तब्बल 80,000 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.
AI Stealing Tech Jobs
AI Stealing Tech JobsEsakal

काही दिवसांपूर्वीच चॅट जीपीटीचे फाऊंडर सॅम अल्टमन यांनी एआयच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. त्यांनी दिलेला हा इशारा आता खरा ठरत असल्याचं दिसत आहे. कारण, केवळ मे महिन्यात टेक क्षेत्रातील सुमारे चार हजार लोकांना एआयमुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे.

2022 साली नोव्हेंबर महिन्यात ओपन एआय (OpenAI) कंपनीने चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट लाँच केला होता. त्यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्टनेही आपापले चॅटबॉट्स लाँच केले. केवळ फोटो, व्हिडिओ एडिटिंगपुरतं एआय मर्यादित न राहता, चक्क कोडिंग करणारे आणि कित्येक टेक्निकल कामे करू शकणारे एआय सॉफ्टवेअर (AI Software) समोर आले आहेत.

AI Stealing Tech Jobs
'AI ठरू शकतं महामारी आणि अणुयुद्धाप्रमाणेच घातक! संपूर्ण मानवता होऊ शकते नष्ट'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

बिझनेस इन्साईडरने इतर काही संस्थांचा डेटा कलेक्ट करून याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यावर्षीच्या मे महिन्यात जगभरातील तब्बल 80,000 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. यातील 3,900 लोकांची नोकरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे गेली असल्याची माहिती (Tech sector people lost jobs because of AI) यात देण्यात आली आहे. इतर लोकांची नोकरी कॉस्ट कटिंग, मर्जर, रिस्ट्रक्चरिंग अशा कारणांमुळे गेली असल्याचं यात म्हटलं आहे.

AI Stealing Tech Jobs
Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध

यावर्षी किती झाले बेरोजगार?

यावर्षी जानेवारी ते मे यादरम्यान जगभरात सुमारे 4 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं. मात्र, एआयमुळे एवढ्या प्रमाणात नोकरी जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

माणसांची जागा घेतंय AI

फेब्रुवारी महिन्यात सुमारे एक हजार कंपन्यांचा सर्व्हे घेण्यात आला होता. यामध्ये असं दिसून आलं, की अमेरिकेतील कित्येक कंपन्या आपल्या एम्प्लॉईजच्या जागी चॅटजीपीटी किंवा अन्य चॅटबॉट्सना प्राधान्य देत आहेत.

AI Stealing Tech Jobs
ChatGPT : "AI वर कंट्रोल हवे नाही तर.." चॅट जीपीटी किंगनेच दिला धक्कादायक इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com