
TOI-3261 b planet discovery : ग्रह तज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक असा दुर्मीळ ग्रह शोधला आहे, जिथं वर्ष फक्त 21 तासांचं असतं! हो तुम्ही बरोबर वाचले आहे. हा नव्याने सापडलेला TOI-3261 b ग्रह ग्रह निर्माणाच्या सिद्धांतांना आव्हान देत असून, त्याचा अभ्यास वैज्ञानिकांसाठी नवी दिशा दाखवणार आहे.
TOI-3261 b हा एक नेपच्यूनच्या आकाराचा अल्ट्रा-हॉट ग्रह आहे, जो आपल्या तार्याच्या इतक्या जवळ आहे की तिथे एक वर्ष फक्त 21 तासांत पूर्ण होतं. ताऱ्याच्या इतक्या जवळ असूनही त्याचं गॅसयुक्त वातावरण टिकून आहे, जे विद्यमान सिद्धांतांना प्रश्नचिन्ह लावतं. हा ग्रह सुमारे 6.5 अब्ज वर्षे जुना असून, तो मूळत: गुरुच्या आकाराचा गॅस जायंट असावा, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
TOI-3261 b चं वातावरण फोटोइव्हापोरेशन (ताऱ्याच्या ऊर्जेमुळे गॅसच्या कणांचं उडून जाणं) आणि टायडल स्ट्रिपिंग (ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे वातावरणाचा हळूहळू नाश होणं) यांसारख्या प्रक्रियांमुळे नष्ट झालं आहे. उरलेलं वातावरण नेपच्यूनपेक्षा दोन पट जड असून, त्यात प्रामुख्याने जड गॅसेस असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.
हा ग्रह त्याच्या अनोख्या स्थितीमुळे वैज्ञानिक संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे या ग्रहाच्या वातावरणाचा इन्फ्रारेड प्रकाशात अभ्यास केला जाऊ शकतो, ज्यामुळे ग्रह निर्माण प्रक्रियेतील अनेक रहस्यं उलगडण्याची शक्यता आहे.
2020 नंतर TOI-3261 b सारख्या अल्ट्रा-शॉर्ट पीरियड ग्रहांच्या गटात आणखी काही ग्रहांची भर पडली आहे, जसे LTT-9779 b, TOI-849 b, आणि TOI-332 b. हे ग्रह अत्यंत कठीण वातावरणात टिकून राहिल्यामुळे, ग्रहांच्या रचनेवर होणाऱ्या भौतिक प्रक्रियांवर प्रकाश टाकण्यास मदत होत आहे.
TOI-3261 b सारख्या ग्रहांचा अभ्यास करून, वैज्ञानिक ब्रह्मांडात उष्ण आणि मोठ्या ग्रहांच्या निर्मितीमागील प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. हा ग्रह केवळ आपल्या अनोख्या वर्षगणनेमुळेच नाही, तर त्याच्या रचनेमुळेही पुढील संशोधनासाठी महत्त्वाचा ठरतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.