
एथर एनर्जीने 'ईएल 01' प्लॅटफॉर्मसह नवे सॉफ्टवेअर आणि क्रूझ कंट्रोल लाँच केले.
6 किलोवॅट चार्जरमुळे 30 किमी प्रवासासाठी 10 मिनिटांत चार्जिंग शक्य आहे.
'रिडक्स' मोटो स्कूटरमध्ये किल्लीविना स्टार्ट आणि थ्रीडी प्रिंटेड सीटसारखी अत्याधुनिक फीचर्स असतील.
Ather Community Day 2025 : इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘एथर एनर्जी’ने आज ‘एथर कम्युनिटी डे 2025’ कार्यक्रमात आपला नाविन्यपूर्ण ‘ईएल 01’ स्कूटर प्लॅटफॉर्म सादर केला. बंगळूर येथील या सोहळ्यात कंपनीने नवे सॉफ्टवेअर, क्रूझ कंट्रोल आणि दुप्पट वेगवान चार्जर लाँच करत ग्राहकांना आकर्षित केले. याशिवाय रिझ्टा फॅमिली स्कूटरला टचस्क्रीन डॅशबोर्ड, नवे रंग आणि रायडिंग मोडसह अपग्रेड करण्यात आले.