एक चूक अन् बँक खाते रिकामे, एटीएममधून पैसे काढताना अशी घ्या काळजी |ATM Security | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

ATM Security: एक चूक अन् बँक खाते रिकामे, एटीएममधून पैसे काढताना अशी घ्या काळजी

ATM Card Safety Tips: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी अनेक नवनवीन मार्ग शोधत आहेत. आर्थिक व्यवहारांसाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. जसे की, नेट बँकिंग, यूपीआय यासोबत एटीएम कार्डचा वापर देखील आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो. यातही प्रामुख्याने एटीएमचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे सायबर गुन्हेगार देखील तुमच्या एटीएमची माहिती चोरून फसवणूक करू शकतात. तुम्ही देखील वारंवार एटीएमचा वापर करत असाल तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एटीएम वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

एटीएम पिन

एटीएम कार्ड वापरून पैसे काढताना पिनचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. इतरांपासून लपून पिन एंटर करावा. तसेच, पैसे काढताना तुमच्या आजुबाजूला अनोळखी व्यक्ती नसेल, याचीही काळजी घ्यावी.

एटीएम पिन आणि कार्डची माहिती कोणालाही देऊ नये

अनेकदा आपण एटीएम पिन व कार्डची माहिती मित्र व नातेवाईकांना देत असतो. परंतु, एटीएमबाबतची माहिती इतरांना देणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पुढे जाऊन कोणीही या माहितीचा वापर करून तुमची फसवणूक करू शकते. अनेक घटनांमध्ये जवळच्या नातेवाईकांनीच फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएम पिन आणि कार्डची माहिती कोणाशीही शेअर करू नये.

हेही वाचा: Mercedes-Benz: फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवलेल्या २ कोटींच्या गाडीत काय आहे खास? जाणून घ्या

एटीएममध्ये लावलेला असू शकतो छुपा कॅमेरा

एटीएममधून पैसे काढताना घाई करू नये. सर्वात प्रथम एटीएम मशीनच्या आजुबाजूला हिडन कॅमेरा तर लावलेला नाही ना, याची माहिती घ्यावी. सोबतच, एटीएम कार्ड स्लॉट देखील पाहावा. अनेकदा स्कॅमर्स एटीएम मशीनमध्ये क्लोनिंग डिव्हाइस आणि कार्ड रीडर चिप लावतात. हे डिव्हाइस एटीएम कार्डचा डेटा चोरी करतात. याच माहितीचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

एटीएम पिनमध्ये वेळोवेळी करा बदल

तुम्ही जर वेळोवेळी एटीएम पिन बदलत असाल तर फ्रॉडची शक्यता खूप कमी होते. तुमची जन्म तारीख, मोबाईल नंबरचा वापर पिन म्हणून करू नका. तसेच, ००००, ११११ अथवा १२३४ असा पिन देखील ठेवू नका.

टॅग्स :moneyatm cardATM