लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण

लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण
Updated on

ब्रिटन साम्राज्यातील काॅर्नवेल इथं १७७८ साली आई मिलेट आणि बाबा राॅबर्ट डेव्ही या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. बाबा लाकडात कोरिव काम करणारा कारागीर तर आई गृहिणी. पाच भावंडात तो सगळ्यात थोरला. त्याच्या गावचं वातावरण हे बरंचसं देवभोळं आणि अंधश्रद्धाळू होतं. म्हणायला काही उच्चभ्रू मंडळींना भाषा-साहित्य यांची आवड होती पण विज्ञानाच्या नावानं इथं अगदीच आनंदीआनंद होता..

शिकार करणं-नेमबाजी-कुस्ती-कोंबड्यांची झुंज आणि दिवस संपता मद्यपान ही इथली सामान्य जीवनशैली. वयाच्या सहाव्या वर्षी त्याचं नाव पेन्झेन्स इथल्या व्याकरण शाळेत दाखल करण्यात आलं. तीन वर्षांनीच त्याच्या कुटूंबानं ल्युडग्वान इथं स्थलांतर केल्यानं त्याला एका सत्रासाठी वस्तीगृहात रहावं लागलं.

इथं कविता-गाणी-गोष्टी या व्यतिरिक्त त्यानं काही केलं नाही किंबहुना तसं पोषक वातावरणही तिथं नव्हतं.

लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण
Google Trends 2021: लोकांचे लसीकरण स्लॉटपेक्षा आयपीएलवरच होते लक्ष

आता हे सुदैव होतं की दुर्दैव माहित नाही पण ‘विद्यार्थी घडवणं’ यासाठी काही विशेष योजना नव्हत्या पण नेमकं हेच त्याच्या पथ्थ्यावर पडलं त्याला त्याच्या आवडीनिवडी जोपासता आल्या-अभ्यासाचीही आखणी करता आली-जसं घडायचं होतं तसं घडता आलं.

गर्दीचा भाग बनून रहात परिस्थितीला दुषणं आणि दैवाला दोष देत सामान्य माणसं सगळं आयुष्य काढतात-चाचपडतात पण असामान्य लोकांचं तसं नसतं,जिथं जिथं अंधार दिसतो तिथं तिथं हे नवीच वाट शोधून काढतात.

तो एव्हाना सोळा वर्षांचा झाला होता, नुकतंच भविष्याबाबतचं स्वप्नरंजन सुरू झालं होतं पण तितक्यातच त्याच्या बाबाचं निधन झालं आणि कुटूंबाची जबाबदारी त्याच्या कोवळ्या खांद्यांवर पडली.

तो स्थानिक शल्यचिकित्सकाकडं हरकाम्या म्हणून रुजू झाला आणि सोबतच औषधं बनवण्याची प्रक्रियाही शिकला.

इथं त्याला प्रयोगांचा नाद लागला तो लागलाच. गडी घरीही वेगवेगळ्या रसायनांसोबत खेळत बसे ज्याचा त्याच्या आजुबाजूच्या मंडळींना त्रासच झाला. त्यानं आणलेल्या रसासनामुळं एकदा बहिणीचे कपडे जळाले-कधी मित्रांना छोट्यामोठ्या इजा झाल्या.

सगळे याबाबत त्याचा निषेध करत पण एरवी चांगला असली तरी इथं मात्र पठ्ठ्या ‘कोडगा’ बनून सगळं ऐकत पहिले पाढे पंचावन्न म्हणून अजूनच प्रयोग करू लागला.

शिकण्याचा-काहीतरी घडण्याचा टप्पा हा असा किचकट आणि मजेशीरच असतो..याच काळात एका विस्थापित फ्रेंच पुजाऱ्याकडनं तो ‘फ्रेंच’ भाषा शिकला.

एक नविन भाषा शिकणं हे एक अख्खं नवं दालन उघडण्यासारखं असतं.

लॅव्होसेर नावाच्या सुप्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाची पुस्तकं आली आणि जणू त्याला अंधारात कवडसाच गवसला.

लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण
ह्रदय- मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड फायदेशीर

कवीमनाचा धडपड्या प्रयोगशील तरुण आता मेटाफिजिक्स-जिओलाॅजी-थिओलाॅजी-केमिस्ट्री यात गुंतू लागला पण इथंही इतर विज्ञानवादी मंडळींपेक्षा त्याच्या आकलन आणि कल्पनांच्या कक्षा जात्याच कवी असल्यानं जास्तच रुंद होत्या,ज्याचा त्याला व्यक्तीश: प्रचंड फायदा झाला.

त्यानं वायूंच्या वेगवेगळ्या प्रयोगात स्वत:ला अक्षरश: झोकून दिलं,अनेकदा तो मरता मरता वाचलाही पण 'नायट्रस ऑक्साइड‘च्या प्रयोगानं त्याला पंतक्रोशीत ने प्रसिद्धी मिळवून दिली..

हा वायू ‘लाफिंग गॅस’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याचा हा प्रयोग बघायला लोकं जमा होऊ लागले-त्याला आमंत्रित केलं जाऊ लागलं आणि हा वायू शस्त्रक्रियेप्रसंगी रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी वापरला जाऊ लागला.

त्यानं ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईडवर अनेक शोधपत्रिका लिहिल्या आणि त्याची ख्याती सर्वदूर पोहोचली.

यातच नव्यानं स्थापन झालेल्या ‘रॉयल इन्स्टिट्युटमध्ये त्याला ‘डेमोन्स्ट्रेटर' पदी नोकरी मिळाली.

या काळात ‘विज्ञान’ नुकतंच बाळसं धरत होतं.

वेगवेगळ्या शाखांबद्दल-त्यातल्या सीमारेषांबद्दल सगळेच अनभिज्ञ होते.

वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करत त्याबद्दल भाषणं देत आणि सामान्यजन ते ऐकायला तिकिट काढून येत.

याच्या भाषणाला लोकं वीस वीस पौंड मोजत असत यावरून त्याच्या तत्कालिन लोकप्रियतेचा अंदाज यावा.

दरम्यानच्या काळात त्यानं खाणकामगारांसाठी ‘सुरक्षादिप’ बनवला आणि त्याची लोकप्रियता अजूनच वाढली.

त्या काळी खाणीत नेलेल्या कंदिल-मशाली यामुळं भुगर्भातील विशिष्ट वायूच्या संपर्कात आल्यानं अनेकदा अपघात होत असत शेकडो मजूर यात दगावत-बायका विधवा आणि मुलं अनाथ होत पण त्याच्या ‘सुरक्षादिप’मुळं अपघातांचं प्रमाण अत्यंत कमी तर झालंच पण खाणकामगारांना अजून खोलवर जाणंही शक्य झालं.

लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण
Dr. John Harvey Kellogg: गोष्ट काॅर्नफ्लेक्सची...!

खाणमालक खुष झाले त्यांनी त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि जवळपास सहा हजार पौंड किमतीच्या भेटवस्तू मानचिन्ह म्हणून दिल्या.

त्याच्या एक ना अनेक प्रयोगामुळं त्याला बख्खळ पैसा मिळू लागला तेव्हा मित्र-हितचिंतक “अजून माग,तिथं गुंतव” असा सल्ला देत पण गडी निस्वार्थी भावनेनं आपल्या कामात लक्ष्य केंद्रित करत असे..

“लोकांचे प्राण वाचणं-त्यांचं आयुष्य सोपं होणं-सुरक्षित होणं” यापेक्षा मोठ्ठं बक्षिस ते काय?खाजगीत अनेकदा तो हे बोलून दाखवत असे..

त्यानं रसायनशास्त्रातील प्रयोगांचा धडाकाच लावला बोरॉन-सोडिअम-पोटॅशिअम-कॅल्शिअम-मॅग्नेशिअम ही मूलद्रव्ये त्यानं त्यांच्या क्षारांपासून विलग केली..

क्लोरिन-आयोडिन-बेरिअम यांच्या शोधांचं श्रेयही त्याचंच..कार्ल शील यांनी शोधलेल्या क्लोरिनचं नामकरणही त्यानं केलं..

व्होल्टानं अखंड विद्युतप्रवाह देणाऱ्या पहिल्या बॅटरीचा अर्थात व्होल्टाइक पाइलचा शोध लावला आणि सगळ्या शास्त्रज्ञांचं लक्ष विद्युत संशोधनाकडं वळलं तो ही याला अपवाद नव्हता..

लाफिंग गॅस, डेव्ही लॅम्पचा शोध लावणारा कवीमनाचा प्रयोगशील तरुण
Colonel Sanders : केएफसीचं चिकन लोकांना एवढं का आवडतं माहितीये?

विद्युत रसायनशास्त्रात संशोधन करताना रासायनिक अभिक्रियेमुळे विद्युतप्रवाह निर्माण होतो असे त्यांना आढळलं..त्यानं एक ना अनेक प्रयोग केले-लिखाण केलं-व्याख्यानं दिली

त्याच्या या अतुल्य योगदानाची चर्चा जगभर पसरली १८१२ साली त्याला ‘सर’ ही उपाधी मिळाली आणि काही वर्षातच राॅयल सोसायटीचं अध्यक्षपदही..

त्यानं अनेक विद्यार्थी घडवले-एक पिढी तयार केली ‘मायकेल फॅरेडे’ हे त्यातलेच एक,ज्यांचा उल्लेख तो गमतीनं ‘माझा सर्वात अमुल्य शोध’ असा करत असे..

आज अवघं विज्ञानविश्व त्याला ‘सर हम्प्री डेव्ही’ या नावानं ओळखतं..

राॅयल सोसायटी विज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांना त्यांच्या स्मरणार्थ ‘डेव्ही पदक’ देतं..

आज सर हम्प्री डेव्ही यांचा जन्मदिन..

विनम्र अभिवादन !!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com