Audi Indiaकडून आजपासून 'ऑडी क्यू ५' कारची बुकिंग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Audi Q 5
Audi Indiaकडून आजपासून 'ऑडी क्यू ५' कारची बुकिंग सुरू

Audi Indiaकडून आजपासून 'ऑडी क्यू ५' कारची बुकिंग सुरू

मुंबई : जर्मनीतील कार निर्माता कंपनी ऑडीने (Audi) आज मंगळवारी (ता.१९) भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ कारसाठी बुकिंगला सुरूवात केली आहे. नवी सुधारित क्यू ५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल. त्याला इन्फोटेनमेंटचे अफाट पर्याय आणि मदतनीस विकल्पांची (असिस्टन्स) उत्तम जोड मिळेल. ऑडी क्यू ५ ही आकार, अजोड कामगिरी आणि उपकरण सज्जतेच्या परिपूर्ण मिलाफासाठी ओळखली जाते. या अतिशय यशस्वी मॉडेलचे तेजतर्रार एक्सटेरिअर डिझाइन तिची Q ओळख तसेच क्वॉट्रो डीएनएला अधोरेखित करते. ऑडी क्यू २ लाख भारतीय रुपये भरून बुक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग वेबसाइट (www.audi.in) आणि ऑडी इंडिया डिलरशीपद्वारेही बुकिंग करता येईल. ऑडी इंडियाचे (Audi India) अध्यक्ष बलबीरसिंह धिल्लन म्हणाले, “भारतातील ऑडीच्या क्यू परिवारात आम्ही आज ऑडी क्यू ५ चा समावेश करत तिची बुकिंगही सुरू केली आहे. २०२१ वर्षातील हे आमचे नववे प्रोडक्ट लाँचिंग राहणार आहे. यंदाच्या आमच्या प्रगतीसाठी आम्ही अत्यंत आनंदी आहोत. ऑडी क्यू ५ (Audi Q 5) ही आपल्या श्रेणीत अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आराम आणि व्यवहार्यता यांचा परिपूर्ण संगम आहे.

हेही वाचा: फक्त २७ हजारांमध्ये घरी आणा Bajaj Discover125,न आवडल्यास करा परत

अगदी पहिल्याच नजरेत ऑडी क्यू ५ चे नवे डिझाइन भुरळ पाडते. या श्रेणीतील धुरंधर म्हणून आम्ही आमचे स्थान बळकट राखू,असा आम्हाला विश्वास आहे. यासोबतच आम्ही आमच्या सध्याच्या व नव्या ग्राहकांनाही आकर्षित करू शकू. आकर्षक डिझाइनयुक्त ही नवी ऑडी क्यू ५ वाहन चालवण्याच्या आपल्या क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह गुणधर्मांसोबत येते. ती या श्रेणीतील सर्वोत्तम वेगाचे भक्कम पाठबळ आहे. ऑडी क्यू ५ ४८.२६ सेंटिमीटर (आर १९) ५ डबल स्पोक स्टार स्टाइल अलाय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध. लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम आदी वैशिष्ट्ये व सुविधांचा अंतर्भाव आहे. ऑडी क्यू ५ ही चारही चाकांसाठी डम्पिंग नियंत्रित सस्पेन्शनने सज्ज आहे. आपल्या २.० लिटरच्या शक्तिशाली टीएफएसआय इंजिनच्या माध्यमातून ऑडी प्रभावी अॅक्सिलरेशन आणि चपळता दाखवते. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अनन्य साधारण गती आणि दिशात्मक स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस २ एअरबॅग्जचाही अंतर्भावासह एकूण ८ एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Audi India Open Its Audi Q 5 Car Booking From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Audi India
go to top