
1 एप्रिलपासून कारच्या किंमतीत 3 टक्के वाढ होणार
इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने घेतला निर्णय
ऑडी इंडियाचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून कार महागणार
जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi)ने मोठा निर्णय घेतला आहे. ऑडी इंडियाने आपल्या कारचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून १ एप्रिल २०२२ पासून एसयूव्ही कारच्या किंमतीत ३ टक्के वाढ करणार आहे. ''इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. (Audi India's cars will be more expensive from April 1)
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वाढत्या खर्चामुळे आणि परकीय चलन दरातील बदलांमुळे आम्हाला आमच्या मॉडेल श्रेणीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे."
हेही वाचा: Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज
ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू२, ऑडी क्यू५, आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ७ स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू८ चा समावेश आहे.
ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन ६०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ऑडी ई-ट्रॉन जीटीचा समावेश आहे.
Web Title: Audi Indias Cars Will Be More Expensive From April 1 Due To Increase In Cost
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..