Best Automatic Cars : गिअरची कटकट सोडा! सात लाखांच्या आत मिळतायत 'या' ऑटोमॅटिक गाड्या; 25 किलोमीटरपर्यंत मायलेज

Budget Automatic Cars : परवडणाऱ्या दरात ऑटोमॅटिक कार घ्यायची असेल, तर सध्या बाजारात कित्येक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
Automatic Cars with Best Mileage
Automatic Cars with Best MileageeSakal

सध्या कित्येक लोक गिअरची गाडी घेण्याच्या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या गाड्यांना पसंती देत आहेत. अगदी आरामदायक प्रवास होत असल्यामुळे या गाड्यांना पसंती वाढली आहे. तुम्हीदेखील नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

परवडणाऱ्या दरात जर तुम्हाला ऑटोमॅटिक कार घ्यायची असेल, तर सध्या बाजारात कित्येक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांची किंमत सात लाखांपेक्षा कमी आहे. तसंच यांचं मायलेज देखील सुमारे २५ किलोमीटर प्रतिलीटर या घरात आहे. अशाच काही गाड्यांची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Automatic Cars with Best Mileage
Car Sunroof : कारला असलेल्या सनरुफचे काय आहेत फायदे-तोटे? नवीन गाडी घेण्यापूर्वी नक्की जाणून घ्या!

Maruti Alto K10

मारुती सुझुकीची अल्टो के10 ही देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे. याची किंमत 5.61 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते. यामध्ये पेट्रोल इंजिन आहे. तसंच 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही गाडी 24 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Maruti S-Presso

मारुतीची ही छोटीशी गाडी एखाद्या एसयूव्ही प्रमाणे दिसते. हॅचबॅक असलेली ही गाडी 5.76 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) उपलब्ध आहे. यामध्ये 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. ही कार 25 किलोमीटर प्रतिलीटर एवढं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Automatic Cars with Best Mileage
Automatic Cars : गिअरची कटकट नको म्हणून ऑटोमॅटिक कार घेताय? आधी हे तोटे वाचाच

Renault Kwid

रेनॉल्टच्या या गाडीमध्ये देखील 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या गाडीचं मायलेज 22 किलोमीटर प्रतिलीटर आहे. याची किंमत 6.12 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.

Maruti Celerio

मारुती सुझुकीची आणखी एक गाडी या लिस्टमध्ये आहे. तुमचं बजेट थोडं जास्त असेल, तर 6.38 लाख रुपयांपासून सुरू होणारी सेलेरिओ ही एक चांगला पर्याय आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल कार म्हणून ही ओळखली जाते. याचं मायलेज 26.68 किलोमीटर एवढं आहे.

Automatic Cars with Best Mileage
Tata Punch CNG : टाटाचा प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'पंच'! 10 लाखांच्या आत लाँच केली दमदार सीएनजी एसयूव्ही कार

Maruti WagonR

मारुतीची टॉल बॉय म्हणून ओळखली जाणारी व्हॅगनार ही गाडीदेखील ऑटोमॅटिक पर्यायात उपलब्ध आहे. याची किंमत 6.54 लाख रुपये (एक्स शोरूम) एवढी आङे. याचं ऑटोमॅटिक व्हर्जन चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही गाडी 24 किलोमीटर प्रतिलीटर एवढं मायलेज देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com