
Smartphone Security Tips Fake Apps : स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. काही अॅप्स तुम्हाला आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढू शकतात. या अॅप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या बँक खात्याला नुकसान पोहोचवू शकतात. अमेरिकेच्या सुरक्षा संस्था FBI ने या संदर्भात इशारा दिला असून, Android आणि iPhone वापरणाऱ्यांनीही सतर्क राहावे, असे सांगितले आहे.
फसवणूक करणारे अॅप्स सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह दिसतात. मात्र, एकदा हे अॅप्स डाउनलोड केल्यावर, ते तुमच्याकडून अनेक महत्त्वाच्या परवानग्या मागतात. या परवानग्यांच्या मदतीने ते तुमच्या खाजगी माहितीवर हात मारू शकतात.
FBI ने 18 जानेवारी रोजी अहवाल सादर केला, ज्यात अनेक बँक खाती हॅक झाल्याचे आढळले आहे. Google आणि Apple त्यांच्या अॅप्सच्या धोरणांमध्ये बदल करत असूनही, स्कॅमर्स अजूनही या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. FBI ने या प्रकाराला "फॅंटम हॅकर" असे नाव दिले आहे.
एकदा हे स्कॅमर्स तुमची माहिती मिळवतात, त्यानंतर ते बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. “तुमच्या खात्यावर हॅकिंगचा प्रयत्न झाला आहे,” असे सांगून, ते तुम्हाला सुरक्षिततेसाठी पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगतात. यामुळे अनेक लोक घाबरून त्यांच्या जाळ्यात अडकतात. याशिवाय, तांत्रिक मदतीच्या नावाखालीही फसवणूक केली जाते.
FBI च्या मते, खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
WhatsApp किंवा SMS द्वारे आलेल्या लिंकवरून कोणतेही अॅप्स डाउनलोड करू नका.
ईमेल किंवा APK फाइलद्वारे आलेल्या अॅप्सपासून दूर रहा.
थर्ड पार्टी (third-party) अॅप स्टोअर्समधून कोणतेही अॅप्स डाउनलोड करू नका.
सोशल मीडियाद्वारे आलेल्या लिंकवरून अॅप्स डाउनलोड करू नका.
कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. अॅप विकसक (developer) आणि इतर युजर्सच्या रेटिंग्स व प्रतिक्रिया नक्की वाचा.
बँकिंग किंवा आर्थिक अॅप्स केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील QR कोड स्कॅन करूनच डाउनलोड करा.
Google Play Store आणि Apple App Store वर स्कॅमर्स चुकीचे अॅप्स अपलोड करतात, त्यामुळे अशा अॅप्सवर डाऊनलोड करण्याआधी योग्य माहिती घ्या.
स्मार्टफोनचा वापर सध्या वाढला आहे, तितकाच त्याचा धोका देखील वाढला आहे. म्हणूनच, कोणत्याही अॅप्सच्या डाउनलोडबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी हा इशारा गांभीर्याने घ्या आणि फसवणूक टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.