पेट्रोल पंपावर मोबाइलवर बोलणे का धोकादायक?वाचा एका क्लिकवर

पेट्रोल पंपावर मोबाइल फोनवर बोलणे धोकादायक असते; कारण त्यातून अपघातांची शक्यता वाढते.
Mobile Care Tips
Mobile Care TipsSakal

दुचाकीस्वार पेट्रोल भरत असताना त्याने खिशातून मोबाइल बाहेर काढल्यानंतर अचानक दुचाकीच्या टाकीने आणि नळीच्या ओजलने पेट घेतला. काही क्षण सगळेच गांगरून गेले. मात्र, दुचाकीस्वाराने सतर्कतेने दुचाकी दूर नेली. कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरचा वापर करीत आग आटोक्यात आणली. वाळूज परिसरातील बजाज कंपनीच्या पेट्रोल पंपावर नुकत्याच झालेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याची चर्चा झाली. मोबाइल पंपावर वापरण्याचे दुष्परिणाम यातून समोर आल्याचे मत पेट्रोल पंपचालकांनी व्‍यक्त केले.

बजाजनगरचे फूलविक्रेते शेख शाकेर हे बजाज कंपनी गेट समोर असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले. पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी बंद करीत उभी केली आणि पंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोलची नळी दुचाकीच्या टाकीत टाकत पेट्रोल भरणे सुरू केले. पेट्रोल भरताना ऑनलाइन पैसे देण्यासाठी शेख शाकेर यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाइल काढला. शाकेर यांनी खिशातून मोबाइल बाहेर काढताच दुचाकीच्या पेट्रोल टाकीतून आगीचा लोळ बाहेर पडला. क्षणार्धात पेट्रोलने भडका घेतला. दुचाकीच्या टाकीला आग लागल्यानंतर दुसरीकडे पेट्रोल पंपाच्या नळीलाही आग लागल्याने आगीचे लोळ बाहेर पडत होते.

शेख शाकेर, कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान

दुचाकीच्या टाकीतून आगीचे लोळ निघत असताना दुचाकीवर बसलेल्या शाकेर यांनाही ते जाणवले. मात्र, त्यांनी घाबरून न जाता दुचाकीवरून उतरत दुचाकी ढकलत पंपापासून दूर नेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा प्रकार घडताच पंपावरील कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरने मारा करीत नळीवरील आग आटोक्यात आणली.

दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना दुचाकी मालकाने दुचाकीपासून दूर उभे राहणे गरजेचे आहे. ऑनलाइन पेमेंट व्यवस्थादेखील काही अंतरावर दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे केल्यास बजाज कंपनीसमोर घडलेल्या प्रकारासारखा प्रकार नक्कीच टळू शकेल. वाहनधारकांना मोबाइल वापरू नका असे पंपावरील कर्मचाऱ्याने सांगितल्यास वाहनधारक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. वाहनधारकांनी देखील नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

— महेश कोल्हे, पेट्रोलपंप मालक

पेट्रोल पंपावर मोबाइलवर बोलणे का धोकादायक?

पेट्रोल पंपावर मोबाइल फोनवर बोलणे धोकादायक असते; कारण त्यातून अपघातांची शक्यता वाढते. खालील कारणांमुळे पेट्रोल पंपावर मोबाइल फोनवर बोलणे धोकादायक ठरू शकते.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स (EMI) : मोबाइल फोनमधून निघणाऱ्या रेडिओफ्रिक्वेंसी सिग्नल्समुळे पेट्रोल पंपाच्या उपकरणांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स होऊ शकतो. यामुळे पंपाचे कामकाज बिघडून अपघात होऊ शकतो.

स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी : पेट्रोल पंपावर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थिर विद्युत निर्माण होऊ शकते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही एक प्रकारची इलेक्ट्रिक चार्ज असतो, जो दोन वस्तू एकमेकांवर घासल्याने निर्माण होतो. पेट्रोल पंपावर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे पेट्रोलच्या वाफांना आग लागण्याची शक्यता असते.

ध्यान विचलित होणे : मोबाइल फोनवर बोलल्यामुळे वाहनचालक किंवा इंधन भरणाऱ्या व्यक्तीचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे इंधन गळती होणे किंवा इतर अपघात होण्याची शक्यता वाढते.

काय होऊ शकते?

आग लागण्याची शक्यता : स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे पेट्रोलच्या वाफांना आग लागू शकते.

स्फोट : पेट्रोलच्या वाफांमुळे स्फोट होऊ शकतो.

इंधन भरण्याची प्रक्रिया बिघडणे : इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्समुळे इंधन भरण्याची प्रक्रिया बिघडू शकते.

आग लागल्यास काय करावे?

सतर्कता : आग लागल्यास घाबरून न जाता तत्काळ सावधगिरी बाळगावी.

इंधन पंप बंद करणे : ज्या ठिकाणी आग लागली आहे तेथील इंधन पंप तत्काळ बंद करावा. अनेक पेट्रोल पंपावर आपत्कालीन बंद करण्याची व्यवस्था असते.

अग्निशमन यंत्रणा : पेट्रोल पंपावर असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा.

रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला कळवणे : आग मोठी असल्यास तत्काळ अग्निशमन दलाला आणि रुग्णवाहिकेला संपर्क साधावा.

लोकांना सुरक्षित अंतरावर हलवणे : परिसरातील लोकांना सुरक्षित अंतरावर हलवावे आणि कोणीही आगीजवळ जाणार नाही याची खात्री करावी.

वाहन बाहेर काढणे : आग जर लहान असेल आणि शक्य असेल तर वाहन पेट्रोल पंपाच्या परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. या सर्व उपाययोजनांमुळे अपघाताची तीव्रता कमी करता येते आणि लोकांचे प्राण वाचवता येतात. पेट्रोल पंपावर नेहमीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com