Password Safety : चुकूनही वापरू नका 'हे' पासवर्ड नाहीतर तुमचा मोबाईल,ऑनलाइन बँकिंग अन् सोशल मीडिया हॅक होणारच! सरकारने जारी केली लिस्ट

Online Safety Weak Password List : सोशल मीडिया आणि बँकिंग अकाउंट्ससाठी कमकुवत पासवर्ड वापरणे धोका निर्माण करु शकते. काही सामान्य कमकुवत पासवर्ड जे लाखो वेळा हॅक झाले आहेत. त्यापासून दूर राहून मजबूत पासवर्ड तयार केले पाहिजेत.
Online Safety Weak Password List
Online Safety Weak Password Listesakal
Updated on

Weak Password List : आजच्या डिजिटलीकरणाच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डवर अवलंबून असतो. स्मार्टफोनपासून, जीमेल, ऑनलाइन बँकिंग आणि सोशल मीडिया अकाउंट्सपर्यंत, पासवर्ड आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. जरी आपल्याकडे पासवर्ड सुरक्षा असली तरी अनेक अकाउंट्स हॅकिंग आणि डेटा चोरीचे शिकार होतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत पासवर्ड्सचा वापर.

बँकिंग आणि सोशल मीडिया अकाउंट्ससाठी पासवर्ड निवडताना विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. NordVPN द्वारा केलेल्या सायबर सुरक्षा अभ्यासानुसार लाखो लोक अजूनही कमजोर पासवर्ड वापरत आहेत जे चिंता निर्माण करणारे आहे. या कमकुवत पासवर्डमुळे डेटा चोरीचा धोका वाढतो.

सरकारने जारी केलेल्या या लिस्टमधील पासवर्डपैकी कोणताही पासवर्ड तुमच्या बँकिंग किंवा सोशल मीडिया अकाउंटसाठी असेल तर तुम्हाला लगेचच तो बदला. हे पासवर्ड्स अत्यंत साधे आणि सहज गेस करण्यासारखे आहेत ज्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.

Online Safety Weak Password List
iPhone 16 प्रो मोबाईलवर 14 हजारांचा डिस्काउंट! फ्लिपकार्ट अ‍ॅमेझॉनवर नाही तर इथे सुरुय जबरदस्त ऑफर

कोणते पासवर्ड्स टाळावे?

  • 123456: 502 मिलियनपेक्षा जास्त डेटा चोरीच्या घटनेत समावेश

  • 123456789: 205 मिलियनदा हॅक झाले

  • 1234: 4.5 मिलियन डेटा चोरीच्या घटनेत वापरले गेले

  • 12345678: 9.8 मिलियन वेळा हॅक झाले

  • 12345: 5 मिलियन वेळा चोरीला गेले

  • password: 10 मिलियन वेळा हॅक झाले

  • 111111: 5.4 मिलियन वेळा चोरीला गेले

  • admin: 5 मिलियन वेळा डेटा चोरीला गेले

  • 123123: 4.3 मिलियन वेळा हॅक झाले

  • abc123: 4.2 मिलियन वेळा सुरक्षा उल्लंघनात समावेश

Online Safety Weak Password List
Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप बनलं कलरफुल अन् म्यूजिकल; अपडेटमध्ये आले नवे 5 फीचर्स, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

कुठेही पासवर्ड तयार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सायबर तज्ञांनी असे सांगितले आहे की आपला पासवर्ड मजबूत आणि युनिक असावा. छोट्या पासवर्डपासून दूर राहा आणि आपल्याशी संबंधित सोपी माहिती वापरणे टाळा. पासवर्डच्या सुरक्षेसाठी विशेष चिन्हांचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे.

आपल्या डिजिटल सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी पासवर्ड निवडताना या सल्ल्यांचे पालन करा आणि योग्य पासवर्ड निवडून तुमच्या अकाउंट्सचे संरक्षण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com