New Bajaj Pulsar : नव्या पल्सरची बाजारात एंट्री; आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स, किंमतही आवाक्यात

Bajaj ने आपल्या नवीन जनरेशन Pulsar P150 बाईकला भारतीय बाजारात लाँच केले आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत १.१६ लाख रुपये आहे.
Bajaj Pulsar P150
Bajaj Pulsar P150sakal

Bajaj Pulsar P150 Launched: देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी Bajaj Auto ने आपली बहुप्रतिक्षित न्यू जनरेशन बजाज प्लसर १५० ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या नवीन बाईकला Pulsar P150 हे नाव दिले आहे. बाईकच्या सिंगल-डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.१६ लाख रुपयांपासून तर, ट्विन-डिस्क व्हेरिएंटची किंमत १.१९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Bajaj Pulsar P150 ला कंपनीने कोलकत्तामध्ये लाँच केले आहे. पुढील काही आठवड्यात बाईक इतर शहरांमध्येदेखील उपलब्ध होईल. बाईकच्या दोन्ही व्हेरिएंटला तुम्ही रेसिंग रेड, कॅरेबियन ब्लू, एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू आणि एबोनी ब्लॅक व्हाइट या ५ रंगात खरेदी करू शकता.

बजाजची सर्वात लोकप्रिय बाईक आहे पल्सर

पल्सर ही बजाजच्या सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. कंपनीने आतापर्यंत इतरही बाईक्सला बाजारात लाँच केले आहे. परंतु, पल्सर सारखी लोकप्रियता खूपच कमी बाईक्सला मिळाली. डिस्कव्हर आणि एक्ससीडी सीरिजच्या लाँचनंतरदेखील पल्सरची लोकप्रियता कायम राहिली आहे.

Bajaj Pulsar P150
Fire-Boltt Smartwatch : भारतीय कंपनीची शानदार स्मार्टवॉच लाँच; थेट घड्याळावरून करता येणार कॉल

शानदार डिझाईनसह येते नवीन पल्सर १५०

बजाजने या अपडेटमध्ये पल्सर १५० च्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये नवीन एअरोडायनॅमिक ३डी फ्रंट आहे, जे ड्यूल कलरमध्ये आकर्षक वाटते. सिंगल-डिस्क व्हेरिएंट हे जास्त अपराइट स्टांससह येते. तर ट्विन डिस्क व्हेरिएंट हे स्पोर्टियर स्टांस आणि स्प्लिट सीटसह येते. सीटची उंची ७९० मिमी असून, यामुळे बाईक चालवताना आरामदायी अनुभव मिळतो. यात बजाज एन१६० प्रमाणे एक्जॉस्ट अंडर बेली यूनिट दिले आहे. सस्पेंशनसाठी फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरमध्ये मोनोशॉक यूनिट्स देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नवीन अपडेटेड व्हर्जन बाईकचे वजन १० किलोंनी कमी झाले आहे.

असे आहेत Pulsar P150 चे फिचर्स

नवीन Bajaj Pulsar P150 मध्ये १४९.६८ सीसी इंजिन दिले असून, हे ८५०० आरपीएमवर १४.५ पीएस पीक पॉवर आणि ६००० आरपीएमवर १३.५ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीनुसार, इंजिनच्या NVH लेव्हलमध्ये देखील बदल करण्यात आला होता. फीचर्सबद्दल सांगायचे तर गियर इंडिकेटर, क्लॉक, फ्यूल इकोनॉमी, डीटीई (डिस्टेंस टू एम्प्टी), एलईडी टेल लॅम्प आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह इन्फिनिटी डिस्प्ले दिला आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी यात एक यूएसबी सॉकेटदेखील देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये सिंगल-चॅनेल एबीएसदेखील देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com