Smartwatch Launched: थेट घड्याळावरून करा कॉल, २ हजारांच्या बजेटमध्ये भारतीय कंपनीची शानदार स्मार्टवॉच लाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boltt Samart Watch

Fire-Boltt Smartwatch : भारतीय कंपनीची शानदार स्मार्टवॉच लाँच; थेट घड्याळावरून करता येणार कॉल

Fire-Boltt New Smartwatch Launched: भारतीय कंपनी फायर-बोल्टने आपली नवीन स्मार्टवॉच Fire-Boltt Ninja Call Pro Plus ला लाँच केले आहे. या स्मार्टवॉचची भारतीय बाजारात विक्री सुरू झाली आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, वॉचमध्ये १.८३ इंच एचडी डिस्प्ले मिळतो. तसेच, १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Fire-Boltt Ninja Call Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स

Fire-Boltt Ninja Call Pro Plus मध्ये १.८३ इंच एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२८४ पिक्सल आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट मिळेल. म्हणजेच, तुम्ही थेट वॉचवरून कॉल करू शकता. वॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन देखील देण्यात आले आहे. तसेच, वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळतो.

Fire-Boltt Ninja Call Pro Plus ची किंमत खूपच कमी आहे. या स्मार्टवॉचला तुम्ही अवघ्या १,९९९ रुपये किंमतीत ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. वॉचमध्ये दमदार बॅटरी लाईफ देखील मिळेल. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ६ दिवस टिकते. वॉचला ब्लॅक, ब्लॅक गोल्ड, पिंक आणि नेव्ही ब्लू रंगात खरेदी करू शकता.

हेही वाचा: IBM Simon : आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी आला होता जगातील पहिला स्मार्टफोन, फीचर्स होते भन्नाट

Ninja Call Pro Plus मध्ये १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले असून, यामध्ये साइकलिंग, रनिंगचा समावेश आहे. हेल्थ फीचर्सबद्दल सांगायचे तर पीरियड ट्रॅकरसह हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकरचा समावेश आहे. कंपनीने या वॉचमध्ये दमदार बॅटरी बॅकअप दिला आहे. नियमित वापरासह वॉचची बॅटरी ६ दिवस टिकते. तर स्टँडबाय टाइम १५ दिवस आहे. वॉचवरून फोनच्या कॅमेऱ्याला देखील कंट्रोल करू शकता. विशेष म्हणजे यात इनबिल्ट गेम देखील देण्यात आल्या आहेत. ही वॉट आयपी६७ वॉटर रेसिस्टेंट रेटिंगसह येते.

टॅग्स :Technology