पाणी साठवणुकीसाठी बांबूची टाकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

अशा कल्पक गोष्टीसाठी बांबू लागवड होणे गरजेचे आहे. कारागिरांना काम मिळेल, प्लास्टिकच्या टाक्‍या कमी होतील, २० ते २५ वर्षे टिकण्याची क्षमता या टाकीची आहे. अपारंपारिक स्टिलचे स्त्रोत संग्रहित होतील. अशी वैशिष्ठ्ये असणारी टाकी कौतुकास पात्र ठरत आहे.
- डॉ. सुनीतकुमार पाटील, प्राचार्य

सावर्डे - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील अनिरुध्द निकम व शुभम तळेकर  या दोन विद्यार्थ्यांनी पाणी साठवणुकीची बांबूची टाकी बनविली आहे. टाकीचे  हे मॉडेल नांदेडला डिपेक्‍स २०१९ राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये चमकणार आहे. 

पूर्वजांनी दिलेल्या माहितीचा आधारे पाणी साठवणुकीची बांबूची टाकी बनविण्याची कल्पना सुचली.ही टाकी बनविण्यासाठी अनेक लोकांशी चर्चा केली. मात्र अनेकांनी अशक्‍य गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. मात्र अनिरुध्द व शुभम यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

कोकणात आढळणाऱ्या माणगा जातीच्या बांबूचा वापर केला. माणगा जाडीला मोठा आणि दणकट असतो. सुरवातील १६०० लिटर क्षमतेची टाकी बनविण्याचा विचार केला. यासाठी पाच बांबूच्या साह्याने बांबूच्या जाळीचा साचा तयार केला. बांबूची बील काढून टाकीचा तळ बनविला. टाकी उभारण्यासाठी एक फुटाचे काँक्रीट टाकून सिमेंट, वाळू व वॉटर प्रुफिंग लिक्विडच्या मदतीने टाकीला प्लॅस्टर केले. टाकीचा तळ उलट्या नरसाळ्यासारखा असल्याने टाकी धुणे सहज शक्‍य आहे. 

अशा कल्पक गोष्टीसाठी बांबू लागवड होणे गरजेचे आहे. कारागिरांना काम मिळेल, प्लास्टिकच्या टाक्‍या कमी होतील, २० ते २५ वर्षे टिकण्याची क्षमता या टाकीची आहे. अपारंपारिक स्टिलचे स्त्रोत संग्रहित होतील. अशी वैशिष्ठ्ये असणारी टाकी कौतुकास पात्र ठरत आहे.
- डॉ. सुनीतकुमार पाटील,
प्राचार्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bamboo Tank for Water Storage