BAPS Temple : 350 सेन्सर, प्रत्येक विटेवर वेगळा नंबर अन् बरंच काही.. अबुधाबीमधील पहिलं हिंदू मंदिर आहे हायटेक!

Abu Dhabi BAPS Temple : हे मंदिर पुढील एक हजार वर्षे सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलं आहे. मंदिर बनवण्यासाठी 30 हजारांहून अधिक दगडांचा वापर केला जातोय.
BAMS Temple Abu Dhabi
BAMS Temple Abu DhabieSakal

First Hindu Temple in Abu Dhabi : पंतप्रधान मोदी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी यूएई दौऱ्यावर आहेत. युनायटेड अरब आमिरातीच्या राजधानीमधअये असणारं हे 108 फूट उंच मंदिर अगदी खास आहे. एवढ्या उंचीचं असूनही या मंदिराच्या बांधकामामध्ये स्टील किंवा लोखंडाचा वापर झालेला नाही हे विशेष.

हे मंदिर पुढील एक हजार वर्षे सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलं आहे. या मंदिराचा पाया उभारुन झालेला आहे. याच्या अभिषेक मंडपाचं काम अद्याप सुरू आहे. हे मंदिर बनवण्यासाठी 30 हजारांहून अधिक दगडांचा वापर केला जातोय. यातील सर्व पिलर्स आणि स्लॅब राजस्थानात तयार करुन, नंतर अबुधाबीला नेले आहेत. (BAPS Temple Abu Dhabi)

350 सेन्सर्सचा वापर

या मंदिराच्या निर्मितीचा खर्च सुमारे 888 कोटी रुपये आहे. 27 एकर एवढ्या मोठ्या परिसरात या मंदिराची निर्मिती केली जात आहे. मंदिराची छत, पाया आणि खांबांवर सुमारे 350 सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर दगडांवरील दबाव, तापमान आणि अगदी अंडरग्राऊंड हालचालींवर देखील लक्ष ठेवतील. भूकंप, वातावरणातील बदल अशा गोष्टींची आगाऊ कल्पना हे सेन्सर देतील. याव्यतिरिक्त मंदिरातील एखादा भाग ठिसूळ होण्याची शक्यता असल्यास, त्याची माहिती देखील हे सेन्सर देतील.

मंदिरातील दगडाच्या प्रत्येक विटेला युनिक नंबर देण्यात आला आहे. राजस्थानात निर्मिती झाली असली, तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात संगमरवर हे इटलीवरुन मागवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या निर्मितीत राजस्थानातील क्ले स्टोनचा वापरही करण्यात आला आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

BAMS Temple Abu Dhabi
PM Modi UAE Tour : UAE मध्ये पंतप्रधान मोदी अन् अध्यक्ष शेख मोहम्मद झायेद यांच्या हस्ते UPI आणि RuPay कार्ड सेवेचा शुभारंभ

इतर सुविधा

या मंदिरामध्ये इतरही बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात एक व्हिजिटर्स सेंटर, प्रेयर हॉल, लर्निंग एरिया, लहान मुलांसाठी प्ले एरिया, थीम गार्डन, एक्झिबिटर्स, फूड कोर्ट, पुस्तकांचं दुकान आणि गिफ्ट शॉप देखील असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com