PubG : बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडियाचं बीटा व्हर्जन कसे कराल डाऊनलोड?

PubG : बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडियाचं बीटा व्हर्जन कसे कराल डाऊनलोड?

वॉशिंग्टन : भारत सरकारने स्मार्टफोन युजरमध्ये अल्पकालावधीत लोकप्रिय झालेल्या पबजी गेमवर सप्टेंबर २०२० मध्ये बंदी घातली होती. आता, पबजी गेमच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. हा गेम भारतात नव्या अवतारात परतणार असून आता या गेमचे नाव ‘बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडिया’ असेल. गुगल प्ले स्टोअरमध्ये या गेमचे ॲपही उपलब्ध झाले आहे. त्यावर युजरना पूर्वनोंदणी करता येईल.

PubG : बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडियाचं बीटा व्हर्जन कसे कराल डाऊनलोड?
जगातील सर्वांधिक मान्यताप्राप्त नेते मोदीच! बायडन यांनाही टाकलं मागे

या नव्या गेममध्ये काही बदल केले असून त्यात ग्रीन ब्लड आणि नवीन खाते प्रणालीचा समावेश आहे, असे वृत्त ‘टेक क्रंच’ या अमेरिकी ऑनलाइन वृत्तपत्राने दिले आहे. मात्र, हा नवीन गेम केवळ भारतातच उपलब्ध असेल, असे पबजी व हा गेम बनविणाऱ्या क्राफ्टन या व्हिडिओ गेम कंपनीने स्पष्ट केले. चीनमध्येही कंपनीने याप्रमाणेच ‘गेम फॉर पीस’ उपलब्ध करून दिला आहे.

‘पबजी’ पुन्हा लाँच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पबजी स्टुडिओने भारतात ‘टेन्सेट’ या कंपनीबरोरचा करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली. आता, नव्या गेमसाठी भारतातील मायक्रोसॉफ्ट अजुर डाटा सेंटरशी करार केला जाईल.

PubG : बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडियाचं बीटा व्हर्जन कसे कराल डाऊनलोड?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य

नव्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या गेमची पूर्व नोंदणी गुगल प्ले स्टोअरवर १८ मे पासून सुरू झाली आहे. इरँगल मॅप हा पब्जी मोबाईलचा सर्वात जुना आणि सर्वात लोकप्रिय मॅप आहे. त्यामुळे हा नवीन मॅप कसा असेल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण गेम डेव्हलपरने दिलं आहे.

PubG : बॅटलग्राऊंड्‌स मोबाईल इंडियाचं बीटा व्हर्जन कसे कराल डाऊनलोड?
सिंहगड, खडकवासल्याला जातायं...500 ची पावती ठरलेली

बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया बेटा व्हर्जन कसे डाऊनलोड कराल?

स्टेप 1 : गुगल प्ले स्टोअरवर जा आणि बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया सर्च करा. त्यासाठीची लिंक इथे आहे. लिंक ओपन केल्यावर बेटा प्रोग्राम जाईन करा.

स्टेप 2 : एकदा का तुम्ही बेटा टेस्टर झालात की तुम्हाला गुगल प्लेवर गेम डाऊनलोड करायचा ऑप्शन येईल. तुम्ही हे बेटा व्हर्जन कधीही सोडू शकता याच लिंकवर जाऊन.

स्टेप 3 : तुम्ही डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही या गेमच्या पेजवर जाल.

स्टेप 4 : यानंतर इन्स्टॉल बटनवर क्लिक करा आणि डाऊनलोडींग सुरु होईल. डाऊनलोड पूर्ण झाल्यावर तुम्ही लॉगइन करुन गेम खेळू शकता.

अल्पवयीन युजरला मर्यादा

‘टेकक्रंच’ने पुढे म्हटले आहे,की बॅटलग्राऊंड्‌स पबजीसारखा असल्याचे दिसते. युजरना पबजीवरील आपले खाते नव्या गेममध्ये सहजरित्या हस्तांतरित करता येईल. त्याचप्रमाणे, गेमशी संबंधित अटी आणि शर्तीही अद्ययावत केल्या आहेत. त्यात अल्पवयीन युजरला गेमवर वेळ आणि पैसा खर्च करण्यासाठी मर्यादा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com