सावधान ! तुमच्या खिशात एक गुप्तहेर आहे

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

पुणे: अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर? तुमच्या खिशामध्ये एक गुप्तहेर लपलेला आहे असेच म्हणावे लागेल. 

पुणे: अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर? तुमच्या खिशामध्ये एक गुप्तहेर लपलेला आहे असेच म्हणावे लागेल. 

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी एनक्रिप्टेड मेसेजेचा अॅक्सेस मिळेल असं एखादं सॉफ्टवेअर दुरूनच (रिमोटली) हॅकर्सना तुमच्या फोनवर इन्स्टॉल करता आलं तर? त्या सॉफ्टवेअरने त्यांना तुमच्या फोनचा माईक आणि कॅमेराही कन्ट्रोल करता आला तर? हे वाटतंय तितकं अशक्य नाही आणि या सॉफ्टवेअरचा वापर हा जगभरातल्या पत्रकार, कार्यकर्ते आणि वकिलांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे ठोसपणे बीबीसीने सांगितले आहे.

माईक मरे हे सॅन फ्रान्सिस्कोच्या लुकआऊट मध्ये सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट आहेत. ही कंपनी सरकार, उद्योग आणि ग्राहकांना त्यांचे फोन आणि डेटा सुरक्षित ठेवायला मदत करते. हेरगिरीसाठीचं आतापर्यंतच सर्वांत आधुनिक सॉफ्टवेअर कसं काम करतं, हे ते समजावून सांगतात. माईक मरे सांगतात. "हे सॉफ्टवेअर वापरणारा तुम्हाला तुमच्या जीपीएसवरून ट्रॅक करू शकतो, "ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं." हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."

सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे. दहशतवाद आणि सुसंघटित गुन्हेगारीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी काही सॉफ्टवेअर किती महत्त्वाचं अस्त्रं ठरू शकतं समजून घेण्यासारखे आहे. सिक्युरिटी कंपन्यांनी एनक्रिप्टेड फोन्स आणि ऍप्स हॅक करता आली तर त्या मार्फतच कितीतरी आयुष्यं वाचवता येतील आणि हिंसक जहालमतवाद्यांना रोखता येईल.

हेरगिरी कशा प्रकारे करता येते ते आपण पाहूया
अहमद मन्सूर या विख्यात आणि पुरस्कार प्राप्त नागरी हक्क कार्यकर्त्यावर युएई सरकारने अनेक वर्षं पाळत ठेवली होती. 2016मध्ये त्यांना एक संशयास्पद मेसेज आला. त्यांनीही तो सिटिझन लॅबला पाठवला. एका ब्लँक आयफोनवरून या रिसर्च टीमने या लिंकवर क्लिक केलं आणि त्यांना जे दिसलं त्याने ते चकित झाले. एक स्मार्टफोन रिमोटली इन्फेक्ट (हॅक) होताना आणि त्या फोनवरचा सगळा डेटा पाठवला जात असल्याचं त्यांनी पाहिलं.

सध्या बाजारात असणाऱ्या फोन्सपैकी आयफोन हा सगळ्यात सुरक्षित असल्याचं मानलं जातं. पण हे हेरगिरीसाठीचं आतापर्यंतच सगळ्यात प्रगत सॉफ्टवेअर होतं आणि या सॉफ्टवेअरने अॅपलच्या सिस्टीममध्येही घुसण्याचा मार्ग शोधला होता. मन्सूरच्या फोनमधून नेमकी कोणती माहिती गोळा करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण नंतर त्याला अटक करून 10 वर्षांचा तुरुंगवास झाला. सध्या तो एकांतवासात बंदिस्त आहे.

लंडनमधील युनायटेड अरब अमिरातीच्या दूतावासाने बीबीसीला सांगितलं की त्यांच्या सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय मानकं आणि नियमांचं पालन करतात पण इतर देशांप्रमाणेच ते देखील गुप्तचर संस्थांच्या माहितीविषयी बोलू शकत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful! Something danger in your pocket