प्रायव्हसी पॉलीसीत व्हॉट्‌सपची माघार; ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

प्रत्येक वेळी तुम्ही सायबर धोक्‍यांच्या कक्षेत असताच. स्कॅमर्स नेहमीच वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड आणि बॅंक अकाउंट आदी महत्त्वाच्या माहितीच्या शोधात असतात. ही माहिती ते बेकायदा बाबींसाठी वापरू शकतात. तुमचा ऑनलाइन खासगीपणा जपण्यासाठी काही उपाययोजना करता येतात. त्याचा हा आढावा.. 

पुणे ः व्हॉट्‌सपने नुकतीच मागे घेतलेल्या "प्रायव्हसी पॉलीसी'मुळे ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑनलाइन तुम्ही जे काही करत असाल. फेसबुकवर पोस्ट करणं, क्रेडिट कार्डाचं बिल भरणं किंवा तुमच्या आवडत्या ऑनलाइन रीटेलरकडून काही खरेदी करणं. प्रत्येक वेळी तुम्ही सायबर धोक्‍यांच्या कक्षेत असताच. स्कॅमर्स नेहमीच वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड आणि बॅंक अकाउंट आदी महत्त्वाच्या माहितीच्या शोधात असतात. ही माहिती ते बेकायदा बाबींसाठी वापरू शकतात. तुमचा ऑनलाइन खासगीपणा जपण्यासाठी काही उपाययोजना करता येतात. त्याचा हा आढावा.. 

- हे सुत्र नेहमी लक्षात ठेवा.
कधीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती ईमेल, टेक्‍स्ट किंवा कॉल करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला देऊ नका. 

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

- बॅंक आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा 
आधार क्रमांक, पासवर्ड, बॅंकेची माहिती कोणी चोरल्यास ते लगेचच मोठे नुकसान करू शकतात. उदा. बॅंक खात्यात गैरव्यवहार करू शकतात, क्रेडिट कार्ड वापरू शकतात किंवा आपल्या नावावर कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे संशयास्पद व्यवहार लक्षात यावेत यासाठी तुमचे क्रेडिट रीपोर्ट, बॅंक स्टेटमेंट आणि क्रेडिट कार्ट स्टेटमेंट नीट तपासणे फार गरजेचे आहे. 

- सार्वजनिक वाय-फायचा वापर करू नका 
सार्वजनिक स्थळे किंवा कॉफी शॉप्स, हॉटेल लॉबीज अशा ठिकाणी मोफत वाय-फायचा वापर करताना बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टलवर जाऊ नका. अशा वायफाय कनेक्‍शनमध्ये बऱ्याचदा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असतो. अशा ठिकाणी सायबर गुन्हेगार अगदी सहज तुमच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये सामील होत लॉगइन माहिती चोरू शकतात. 

- डिव्हाइस सिक्‍युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा 
उपकरणे व्हायरसेसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे मालवेअर त्यात येऊ नये यासाठी सर्व उपकरणांमध्ये विश्वासार्ह "डिव्हाइस सेक्‍युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल' करणे, रन करणे महत्त्वाचे आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर उत्पादक कंपनीकडून येणाऱ्या अपडेट्‌सना परवानगी द्या. नवे व्हायरस, ट्रोजन्स आणि मालवेअरचा सामना करण्याच्या दृष्टीने हे अपडेट केले जातात. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

- फिशिंग स्कॅम्सवर नजर ठेवा 
ऑनलाइन बॅंक अकाऊंट किंवा क्रेडिट कार्ड पोर्टल्सची लॉगइन माहिती देण्यासाठी खोटे ईमेल किंवा टेक्‍स्ट पाठवले जातात. बॅंकेने किंवा सेवा प्रदातानेच पाठवला आहे असे वाटावे, असा अनपेक्षित ईमेल येतो. खाते किंवा कार्ड बंद पडू नये म्हणून त्याची शहानिशा (व्हेरिफाय) करावी लागेल, असे त्यात नमूद केलेले असते. वैयक्तिक आणि आर्थिक माहिती भरण्यासाठी एका वेब पेजवर नेणारी लिंक त्यात असते. अशी माहिती कधीही देऊ नका. लक्षात घ्या बॅंक किंवा सेवा प्रदाता कधीही अशाप्रकारे ऑनलाइन माहिती विचारणार नाही. 

- पासवर्ड बदला 
नियमितपणे पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे ऑनलाइन अकाऊंट ऍक्‍सेस करण्यात स्कॅमर्सना अडचणी येतात. 

 पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful while transacting online WhatsApp withdrawal from privacy policy