50 मेगापिक्सल कॅमेरा असलेले बेस्ट 5G फोन, किंमत 15 हजारांपासून सुरू

best 5g smartphone with 50 MP camera 5000mAh battery in india check price and specifications
best 5g smartphone with 50 MP camera 5000mAh battery in india check price and specifications

Best 5G Smartphone with 50 MP Camera : यंदा एप्रिल ते जून या कालावधी मध्ये भारतात 5G नेटवर्क उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे सध्या अनेकांचा कल वाढत आहे. भारतात अनेक कंपन्यांनी त्यांचे 5G स्मार्टफोन लॉंच केले आहेत आणि त्यापैकी बरेच अगदी कमी किमतीत येतात. या 5G स्मार्टफोन्समध्ये 5000mAh पॉवरफुल बॅटरी यासोबतच 50 मेगापिक्सल्सचा कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. चला तर मग त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया -

Vivo T1 5G

Vivo T1 5G या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटमिळतो. तसेच फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 6nm आधारित स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह येतो. हा फोन Android 12 आधारित funtouch OS 12 वर काम करेल. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि बोकेह कॅमेरा आणि AI मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो. दरम्यान फोनची किंमत ही 14,990 रुपये इतकी आहे.

best 5g smartphone with 50 MP camera 5000mAh battery in india check price and specifications
इस्रो उद्या लॉंच करणार PSLV-C52; प्रक्षेपण Live कसे पाहावे? वाचा

Tecno Pova 5G

Tecno Pova 5G फोन मध्ये 6.9-इंचाचा FHD+ डॉट-इन डिस्प्ले आहे. फोनला 120 Hz स्क्रीन रिफ्रेश रेट आणि 180 Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. फोन MediaTek Dimensity 900 चिपसेट सह येतो आणि Tecno Pova 5G मध्ये देखील तुम्हाला 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात येतो. Pova 5G मध्ये 6000mAh बॅटरी आहे आणि याची किंमत - 19,999 रुपये इतकी आहे.

best 5g smartphone with 50 MP camera 5000mAh battery in india check price and specifications
'व्हॅलेंटाईन डे'साठी परफेक्ट गिफ्ट, बजेटमध्ये मिळतील हे 5 गॅजेट्स

Motorola G71

Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर आधारित नियर-स्टॉक Android प्लॅटफॉर्मवर काम करेल. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असेल lj सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 18,999 रुपये इतकी आहे.

best 5g smartphone with 50 MP camera 5000mAh battery in india check price and specifications
प्रेमप्रकरणातून तरुणीने युवकास जिंवत जाळले, नाशिक जिल्ह्यात खळबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com