esakal | Flipkart वर खास सेल, 20 हजार रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन
sakal

बोलून बातमी शोधा

Samsung Galaxy F42 5G

Flipkart वर खास सेल, 20 हजार रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या Flipkart वर Flipkart Big Billion Days सेल चालू आहे. या सेलमध्ये जवळपास सर्व स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि सूट दिली जात आहे. तुम्ही प्रिमीयम 5G स्मार्टफोन खरेदी खरण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक 5G स्मार्टफोन चांगल्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेलमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील अशा काही 5G स्मार्टफोनबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G (Samsung Galaxy F42 5G)

सॅमसंग गॅलेक्सी एफ 42 5 जी स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. या फोनचे इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच यात 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे तर, Samsung Galaxy F42 5G मध्ये 64MP + 5MP + 2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी F42 5G वर 6000 रुपयांपर्यंत सूट, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 3000 रुपयांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय मिळेल. किंमत: 17,999 रुपये.

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

Realme GT मास्टर एडिशन 5G (Realme GT Master Edition 5G)

Realme GT स्मार्टफोन 6.43-इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसर दिला असून एड्रेनो 660 GPU आहे. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत 64MP सोनी IMX682 सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. तर सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल. आयसीआयसीआय बँकेकडून ग्राहकांना 10 टक्के सूट आणि रिअॅलिटी जीटी मास्टर एडिशनच्या खरेदीवर 2000 रुपयांची विशेष सवलत मिळेल. या व्यतिरिक्त, हा फोन तुम्हाला ईएमआय आणि दरमहा 4,667 च्या एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येईल. किंमत: 19,999 रुपये.

हेही वाचा: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

मोटोरोला एज 20 फ्यूजन 5 जी (Motorola Edge 20 Fusion 5G)

मोटोरोला एज 20 फ्यूजन 5G च्या खरेदीवर अॅक्सिस बँकेकडून 10 टक्के सूट दिली जाईल. यासोबत फोनच्या खरेदीवर 5000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय 15000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि फोनवर नो-कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, मोटोरोला एज 20 फ्यूजन 5G मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक 9800U 5G प्रोसेसर, 6.7-इंच HD प्लस डिस्प्ले आणि 108MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. किंमत: 19,990 रुपये

loading image
go to top