esakal | रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Royal Enfield Classic 350

रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बऱ्याच दिवसांपासून बाइक प्रेमी रॉयल एनफील्डच्या क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) लॉंच होण्याची वाट पाहात होते. या बाईकचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये विक्रीसाठी लाँच करण्यात आले आणि लाँच होताच कंपनीच्या नावा वर एक विश्वविक्रम नोंदवला गेला. काय आहे हा विश्वविक्रम वाचा सविस्तर

Royal Enfield चे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

रॉयल एनफील्डची ही नवीन बाईक लॉन्च केली जात असताना, हा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमींग यूट्यूबवर करण्यात आले होते. या दरम्यान यूट्यूबवर सर्वाधिक Live Viewershipचे यापुर्वीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आजवरची सर्वाधिक Viewership या इंव्हेंटला मिळाली त्याममुळे कंपनीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये Guinness world records) नोंदवले गेले.

1 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 ते 12 दरम्यान ऑनलाईन लॉंच अर्धा तास चाललेल्या या लाईव्ह स्ट्रीमिंगला एकूण 19,564 व्ह्युव्हर्स मिळाले. त्यानंतर रॉयल एनफिल्ड कंपनीने त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. याआधीचा 13,779 लाइव्ह Viewershipचा रेकॉर्ड कंपनीने या इव्हेंट दरम्यान मोडीत काढला.

हेही वाचा: 15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

Royal Enfield कंपनीने क्लासिक 350 बाईकची किंमत 1.84 लाख रुपय किंमतीला लॉंच केली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक असून याच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. बाईक कंपनीच्या नवीन J मॉड्यूलर आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यावर कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेले मेट्योर 350 देखील बेस्ड होती.

कंपनीने या बाईकमध्ये 349cc क्षमतेचे नवीन फ्यूल इंजेक्टेड इंजिन SOHC मॅकमिजम वापरले आहे जे 20.3 Hp ची पॉवर आणि 27 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. नवीन क्लासिक 350 बाईक नवीन रंग आणि आकर्षक फीचर्ससह लॉंच केली गेली असून त्याच्या ड्रायव्हिंगमध्येही खूप सुधारणा झाली आहे, आता ही बाईक पूर्वीपेक्षा कमी व्हायब्रेट करते.

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

loading image
go to top