25 हजारांत मिळणारे बेस्ट 5G स्मार्टफोन्स, येथे पाहा यादी

best affordable 5g smartphones in 2022 under 25000 rupees check list here
best affordable 5g smartphones in 2022 under 25000 rupees check list here

आपल्यापैकी बरेच जण हे कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, बॅटरी, गेमिंग या बाबतीत बेस्ट स्मार्टफोन शोधत असतो. या सोबतच 5G कनेक्टिव्हिटी देखील हवी असते, कारण भारतात लवकरच 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आज आपण काही 5G स्मार्टफोन्सची यादी पाहाणार आहोत, जे पावरफुल हार्डवेअर, कॅमेरा सेटअप, डिस्प्ले, बॅटरी आणि गेमिंग मोडसह येतात.

Realme 9 Pro

Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये 90Hz सुपर AMOLED डिस्प्ले दिला ज्यामध्ये 4500 mAh बॅटरी सपोर्ट मिळतो. तसेच या स्मार्टफोन सोनी IMX766 सेन्सर असलेला हा सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. यात MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसर आहे. फोन आउट ऑफ दी बॉक्स Android 12 वर आधारित Realme UI 3.0 सह येतो. 16MP सेल्फी कॅमेरा Reality 9 Pro+ मध्ये उपलब्ध आहे. Realme 9 Pro+ तीन रंगांमध्ये येतो - सनराईज ब्लू, अरोरा ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक. किंमत - 24,999 रुपये

Realme 9 5G स्पीड एडिशन

Realme 9 5G स्पीड एडिशन हा सर्वात वेगवान 5G मिड-रेंजर स्मार्टफोन आहे. हे स्नॅपड्रॅगन 778G 5G प्रोसेसर सपोर्टसह येतो. तसेच यात 6.6” 144Hz अल्ट्रा स्मूथ फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme 9 5G स्पीड एडिशन 48MP ट्रिपल नाईटस्केप कॅमेरा सेटअप आणि 5GB पर्यंत DRE सह येतो आणि 30W DartCharge सपोर्टसह यात 5000mAh बॅटरी मिळते. Realme 9 5G स्पीड एडिशन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे - Azure Glow आणि Starry Glow. किंमत - 19,999 रुपये

OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. यात 6.59-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट अॅड्रेनो 619 GPU, 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळतो. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 वर आधारित Oxygen OS 12.1 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाची फुल-एचडी+ स्क्रीन आहे. किंमत -19,999 रुपये

best affordable 5g smartphones in 2022 under 25000 rupees check list here
स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

Redmi Note 11 Pro+ 5G

Redmi Note 11 Pro + 5G मध्ये 108MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन Snapdragon 695 SoC सपोर्टसह येतो. यात 1200 nits ची पीक ब्राइटनेससह 6.67-इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. Redmi Note 11 pro + 5G तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. किंमत - 20,999 रुपये

best affordable 5g smartphones in 2022 under 25000 rupees check list here
TVS ने लाँच केलं स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; वाचा किंमत अन् फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com